Siddhi Kadam Mohol Assembly Constituency : शरद पवार हे महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणावर त्यांची मागच्या सहा दशकांपासून पकड आहे. शरद पवार केंद्रात असोत किंवा राज्यात त्यांचं महाराष्ट्रावर बारीक लक्ष असतं. २०२२ मध्ये अजित पवारांनी वेगळी चूल मांडली तरीही त्यांनी राज्यभरात दौरा करुन आपला पक्ष पुन्हा उभा केला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ तरुणांना कायमच पडते. यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देताना दोन सर्वात तरुण उमेदवार ( Sharad Pawar NCP Young Candidate ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानेच दिले आहेत. एक आहेत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील तर दुसऱ्या आहेत सिद्धी कदम. या दोन तरुण उमेदवारांबाबत आपण जाणून घेऊ.
मोहोळमधून सिद्धी कदम यांना उमेदवारी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार आहेत. मोहोळ मतदार संघात सिद्धी कदम यांचा सामना राष्ट्रवादी ( Sharad Pawar NCP Young Candidate ) अजित पवार गटाचे यशवंत माने यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सिद्धी कदम निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कमी वयाच्या महिला आमदार म्हणून त्यांच्या नावे रेकॉर्ड होऊ शकतो. त्यांचं वय अवघं २७ वर्षे आहे. त्यानंतर सर्वात कमी वयाचे उमेदवार ( Sharad Pawar NCP Young Candidate ) ठरले आहेत ते म्हणजे रोहित पाटील.
हे पण वाचा- १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार! काका-पुतण्यामध्ये कोण बाजी मारणार?
कोण आहेत रोहित पाटील?
रोहित पाटील हे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे. रोहित पाटील हे २३ वर्षांचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने या तासगाव मतदारसंघातून संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा रोहित पाटील हा मुलगा ( Sharad Pawar NCP Young Candidate ) आहे. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी आर. आर.पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. रोहित पाटील यांची बहीण स्मिता पाटील यांनीही राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद होतं. रोहित पाटील सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्वीटरवर त्यांचे ४० हजारांच्या वर फॉलोअर्स आहेत.
रोहित पाटील यांना तिकिट देण्यामागची राजकीय पार्श्वभूमी काय?
रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायीत १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला होता. नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं श्रेय रोहित पाटील यांना जातं कारण या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. १९ जानेवारी २०२२ ला हे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर विधानसभेला रोहित पाटील यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यानुसार शरद पवार यांनी रोहित पाटील यांना निवडणुकीचं तिकिट दिलंय. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतले हे दोन तरुण उमेदवार ( Sharad Pawar NCP Young Candidate ) चर्चेचा विषय ठरले आहेत.