विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अवघ्या पाच दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) असे तीन पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) असे तीन पक्ष आहेत. तसंच राज ठाकरेंच्या मनसेनेही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. दरम्यान शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. इतरही घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांना विचारण्यात आलं की काही जण म्हणत आहेत की ही तुमची शेवटची निवडणूक आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, “कुणी काहीही म्हणो, जोपर्यंत मी काम करु शकतो, हिंडू शकतो, फिरु शकतो तोपर्यंत मी काम करत राहणार. मी थेट निवडणुकीच्या प्रक्रियेत नाही असं मी म्हटल्याने सगळ्या चर्चा सुरु झाल्या. १९६७ ला मी पहिली निवडणूक त्यानंतर सतत मी कुठल्या ना कुठल्यातरी सदनात आहे. ५६ वर्षांपासून मी राज्य किंवा देशाच्या राजकारणात आहे. मला एकही दिवस ब्रेक मिळालेला नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की थेट लोकसभेची निवडणूक लढवायची नाही. राज्यसभेत मी आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहणं, लोकांकडून स्वतःसाठी मतं मागणं हे मी करणार नाही असं ठरवलं आहे. मी पक्षाचं काम करणार आहे” असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”

मी आणि अजित एकत्र होतो तेव्हा..

“मी आणि अजित पवार एकत्र होतो त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता की लोकसभा लढवून मी दिल्लीत जाणार तर महाराष्ट्रातलं काम हे अजितने बघायचं. साखर कारखाने, सहकारी संस्था या सगळ्या गोष्टींची जबाबदारी, समाजकारण, राजकारण याच्याशी संबंधित सगळ्यांचा अधिकार मी त्यांच्या हाती दिला होता. पक्ष संघटनेतही कुणी असावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. आम्ही जो विचार स्वीकारला त्यात ते (अजित पवार) होते. मी राजकारणात उतरुन जो विचार सांभाळला, भाजपाशी संघर्ष केला त्यात ते होते. आज अजित पवार दुसऱ्या रस्त्याने गेले आहेत. आम्हाला वैचारिकदृष्ट्या ती मान्य नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही” असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

हे पण वाचा- Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?

सुप्रियाला लोकांनी निवडून दिलं-शरद पवार

“लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांच्या पत्नीला उभं केलं. सुप्रियाला आम्ही उभं केलं होतं. तिचा संसदेतला परफॉरमन्स चांगला आहे. बारामती आणि तिथल्या लोकांनी सुप्रियाच्या बाजूने निर्णय दिला” असंही लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी हे भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ प्रशासन..

“देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष असण्याचं काहीच कारण नाही त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे माझे चांगले मित्र होते. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणंही होतं. देवेंद्र तेव्हा लहान होते, पण माझ्या त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. काही गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची स्वच्छ प्रशासन देण्याची इच्छा आहे अशी जनमानसांत भावना होती, जी फारशी चुकीची नव्हती. मी व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत हे म्हणतो आहे.” असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader