अजित पवारांनी बारामतीतील एका सभेत बोलताना शरद पवार हे लवकरच राजकारणातून निवृत्त होणार असून त्यानंतर बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. त्यामुळे भावनिक होऊ मतदान करू नका, असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर शरद पवारांचा राजकीय वारस कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांच्या विधानाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, उद्या कुणी म्हणत असेल, मीच देशाचा प्रमुख, तर तू म्हण बाबा माझी काही तक्रार नाही. पण, हे लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला. तसेच लोकसभेला जशी गंमत केली, तशी विधानसभेला करू नका, असंही अजित पवार म्हणाले होते. यासंदर्भात विचारलं असता,” गंमत म्हणजे काय? त्यांना मतं दिली नाहीत, हेच ना. दुसरं काय? लोकांचा अधिकार आहे तो. त्यांना योग्य वाटलं ते केलं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा – Supriya Sule: “भाजपाकडून रडीचा डाव, अजित पवारांनीही दिली कबुली”, तुतारी-पिपाणीवरुन सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीतील एका सभेत बोलताना, बारामतीकरांना भावनिक न होता मतदान करण्याचं आव्हान केलं होतं. “तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. शरद पवारांनी सांगितलं आहे की दीड वर्षांनी ते पुन्हा उभे राहणार नाहीत, निवडणूक लढवणार नाही, खासदारही होणार नाहीत. त्यानंतर कोण बघणार आहे? कुणात तेवढी धमक आहे? कुणात तेवढी ताकद आहे याचा विचार करा”, असं अजित पवार म्हणाले होते.

हेही वाचा – Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…

तसेच “आपल्याला अजून सुपा परगणा आणि बाकीच्या भागात करायची आहे. माझ्या कारकि‍र्दीत पाण्याच्या बाबतीत माझ्या भागाला मी स्वयंपूर्ण केलं आहे, हे मला कृतीतून दाखवायचं आहे. शरद पवारांनीही २४ वर्षांत पाझर तलाव वगैरे गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून आपला प्रश्न निकाली निघालेला नाही”, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं होतं.