Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान

शरद पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप प्रसंगी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Sharad Pawar Statement About Jayant Patil
शरद पवार यांचं जयंत पाटील यांच्याबाबत सूचक वक्तव्य (फोटो-लोकसत्ता)

Sharad Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघा एक महिना उरला आहे. महायुतीने पत्रकार परिषद घेऊन सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवारांना ( Sharad Pawar ) आव्हान देत आधी महाविकास आघाडीने चेहरा सांगावा असं विधान केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान शरद पवारांनी ( Sharad Pawar ) स्वीकारलं का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे. त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे. महाराष्ट्राची जी प्रतिमा महायुतीमुळे मलीन झाली आहे ती सुधारण्याची आवश्यकता आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करु शकतात याची मला खात्री आहे. असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाच्या भाषणात म्हटलं. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना काय आव्हान दिलं होतं?

महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे. फडणवीस म्हणाले, सत्ता पक्षाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री स्वतःच इथे आमच्याबरोबर बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण. माझं शरद पवारांना खुलं आव्हान आहे शरद पवारांनी तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ते सांगा? असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी ( Sharad Pawar ) सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी फडणवीसांचं आव्हान स्वीकारल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हे पण वाचा- इंदापूरनंतर महायुतीला दौंडमध्ये धक्का, माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला

आणखी काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांनी सात हजार किमीची शिवस्वराज्य यात्रा काढली. तसंच ते सुमारे ७६ मतदारसंघांमध्ये गेले होते. आपलं राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला आणि त्यांनी लोकांमद्ये आशा पल्लवित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राला योग्य दिशा देतील.

लोकसभेला मतदारांनी महायुतीला जागा दाखवली

मतदारांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारने मग विविध योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केल्याचं महायुतीने सांगितलं पण महिला सुरक्षेचं काय? कारण अत्याचारांच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत असं शरद पवार ( Sharad Pawar ) यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar said confident that maharashtra will progress under jayant patil scj

First published on: 17-10-2024 at 09:08 IST
Show comments