महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपते आहे. शरद पवारांनी युगेंद्र पवारांसाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडला. तसंच लाडकी बहीण योजनेवरुनही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज फेडणंं या सरकारला जमलेलं नाही. शेतमालाला किंमत द्यायची नाही, निर्यातबंदी लादायची हे या सरकारचं धोरण आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हटलं आहे?

आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत. याआधी लोकसभेची निवडणूक आपण केली. याच जागेवर शेवटची जाहीर सभा लोकसभेची जाहीर सभा इथेच आयोजित केली होती. लोकसभा निवडणूक, त्यातला निकाल हा देशाला महाराष्ट्र म्हणजे काय चीज आहे ते दाखवून देणारा होता. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची इच्छा काय होती मला माहीत नाही. पण या लोकसभा निवडणुकीत ४०० खासदार निवडून द्यावे असं ते म्हणत होते. देशाचा कारभार करायचा असेल, लोकसभा चालवायची असेल तर ४०० खासदारांची गरज लागत नाही. जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली त्यात बदल करायचा असेल तर जास्त खासदार लागतात. याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ती घटना बदलण्याचा प्रयत्न करायचा असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांची शेवटची प्रचारसभा लेंडीपट्टा मैदानातून घेतली. या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”

“शरद पवारांनी संधी दिली तेव्हा भीती वाटत होती”, अजित पवारांनी सांगितली ३४ वर्षांपूर्वीची ‘ती’ आठवण!

लाडकी बहीण योजना आणता महिला सुरक्षेचं काय?

तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीत आम्हाला चांगलं यश दिलं. सुप्रिया सुळे बारामतीतून विजयी झाल्या. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ३० खासदार तुम्ही आमचे निवडले आणि मोदींना बाजूला सारण्यासाठी तुम्ही योग प्रयत्न केले. लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना सुरु केली. पण एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने बहिणींची अवस्था काय? ज्यांच्या हाती सरकार आहे त्यांच्या कालखंडात महिलांवर अत्याचार किती झाले बघा. पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्या आहेत त्या ६७ हजारांहून अधिक आहे. इतक्या भगिनींवर अत्याचार केले गेले. लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे ही स्थिती? असा सवाल शरद पवार यांनी म्हटलं आहे.

६४ हजार कुठे गेल्या?

महाराष्ट्रातल्या ६४ हजार भगिनी कुठे गेल्या? त्यांना काय सुरक्षा दिली? ते सांगता येईल का? एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे हे वास्तवही सहन करायचं का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. शरद पवार यांनी युगेंद्र पवारांसाठी सभा घेतली त्यावेळी त्यांनी हे सवाल केले आहेत. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांवरुन त्यांनी सरकारला सवाल केले आहेत.

मी १९६७ ला पहिल्यांदा निवडून दिलं. त्यानंतर तुम्ही अजित पवारांना संधी दिली, त्यांना तीन-तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता पुढची पिढी युगेंद्रची आहे. युगेंद्रच्या हाती सत्ता द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. असं शरद पवार म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून या तालुक्यातल्या गावागावंमध्ये फिरुन त्यांनी लोकांशी संपर्क केला, जनतेशी सुसंवाद साधला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही जसं काम केलं त्यापेक्षा जास्त क्षमता युगेंद्र पवारांमध्ये आहे असंही शरद पवार म्हणाले.