शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात केलेली विधानं चांगलीच चर्चेत आली आहेत. आधी शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी घडलेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं होतं. अगदी अलिकडे त्यांनी भाजपाला सुप्रिया सुळेंना हरवायचं आहे कारण त्यांना वाटतं यामुळे शरद पवार पराभूत होतील, अशा आशयाचं विधान केलं होतं. आज माध्यमांशी बोलताना सरोज पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं आहे. शरद पवारांचा उल्लेख करत त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. तसेच, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याबाबतीतही त्यांनी भूमिका मांडली आहे.

“निवडणुका संपल्या की काळे ढग दूर होतील”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीप्रमाणेच पवार कुटुंबातील फूटदेखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचीही चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातच फूट पडल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना सरोज पाटील यांनी हे सगळं फक्त निवडणुकीपुरतं असल्याचं विधान केलं आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

अजित पवारांना पश्चात्ताप!

अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे दु:ख झाल्याचं म्हणतानाच त्यांनी अजित पवारांना त्याचा पश्चात्तापही झाला असेल, असं नमूद केलं आहे. “राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख वाटतंय. पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलंय की रडत बसायचं नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही. पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आलं असेल. कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल”, असं त्या म्हणाल्या.

भाजपाला केलं लक्ष्य

यावेळी बोलताना सरोज पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. “भाजपाचा सगळा रोख शरद पवारांवर आहे. हा माणूस खलास केला, की राज्य आपल्या हातात आलं असं त्यांना वाटतं. म्हणून आंब्याच्या झाडाला जसं लोक दगडं मारतात, तसे ते शरद पवारांवर दगडं मारत आहेत”, असं सरोज पाटील म्हणाल्या. बुधवारीही “भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना (भाजपा) वाटतं. पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत”, असं विधान त्यांनी केलं होतं.

शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं मोठं विधान; म्हणाल्या, “हे सगळं राजकारणापुरतं आहे, निवडणुका संपल्या की…!”

सुप्रिया सुळेंचं कौतुक

दरम्यान, सरोज पाटील यांनी सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं आहे. “सुप्रियाचं मला आश्चर्य वाटतं. ती सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. तिला फुलासारखं वागवलं आहे लहानपणापासून. पण तिनं स्वत:मध्ये जो कायापालट केला त्याला तोड नाही. आम्हालाही कुणाला असं बोलता येणार नाही इतकं सुंदर ती लोकसभेत बोलते. मला कधीकधी लिहावंसं वाटतं की बाप से बेटी सवाई. तिचा अभ्यास खूप आहे. तिनं फार प्रगती केली आहे. तिला मराठी नीट बोलता येत नव्हतं. त्यात तिनं बरीच सुधारणा केली”, असं त्या म्हणाल्या.

“मला बाकीचं काही सांगता येत नाही. काय होईल. कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात. पण सगळे लोक हा वाद घालतात ते चुकीचं आहे. आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही हे मला माहिती आहे. आता कुणाच्या बाजूने जायचं हे लोकांनी ठरवावं”, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.