BJP Radhakrishna Vikhe Patil vs Congress Prabhavati Ghogare in Shirdi Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागला. उत्तर महराष्ट्रातील या दोन महत्त्वाच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे जिल्ह्याचे नेते, राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाला धक्का मिळाल्याचे बोलले गेले. त्यातच दक्षिण अहमदनगरमध्ये तर त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मतदारसंघ राखण्याचे आव्हान होते. तर लोकसभेत मविआने दोन्ही मतदारसंघात विजय मिळविल्यामुळे मविआकडून विखे पाटील यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली जाईल, असे वाटत होते.

शिर्डी विधानसभेचा निकाल

मात्र शिर्डी विधानसभेचा गड राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभेद्य राखला आहे. विखे पाटील यांनी १ लाख ४४ हजार ७७८ मते घेतली. तर ७०,२८२ मताधिक्य मिळविले. काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे या दुसऱ्या स्थानी राहिल्या. त्यांना ७४,४९६ मते मिळाली. या दोघांव्यतिरिक्त इतर उमेदवारांना फारशी मते मिळालेली नाहीत.

Nilesh Lanke Wife Got Ticket From Sharad Pawar NCP
Rani Lanke : निलेश लंकेंना शरद पवारांचं ‘डबल गिफ्ट’, राणी लंकेंना पारनेरमधून विधानसभा निवडणुकीचं तिकिट
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Karjat Jamkhed vidhan sabha elections 2024
Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency: कर्जत-जामखेड विधानसभेत रोहित पवारांचा निसटता विजय; राम शिंदेंची अजित पवारांवर आगपाखड
Manoj Jarange on Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
Karad South Constituency in Assembly Election
Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीबाबा पर्व संपले, आता ‘अतुलबाबा’ भोसले बनले आमदार
Satara Assembly Constituency Maharashtra Assembly Election
Satara Assembly Constituency: शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेत नोंदविला मोठा विजय
shirdi assembly seat election result
शिर्डी विधानसभेचा २०२४ चा निकाल

शिर्डी विधानसभा मतदारसंघाची माहिती

श्री साई बाबा देवस्थानामुळे संपूर्ण देशभरातून आणि जगभरातून भाविक शिर्डीत येत असतात. शिर्डी विधानसभा मतदारसंघ राहाता व संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश होतो. शिर्डी आणि राहता-पिंपळा या दोन नगरपालिकांचा या मतदारसंघात समावेश होतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघात हा विधानसभा मतदारसंघ मोडतो.

हे वाचा >> कारण राजकारण: विखेंविरोधात ‘मविआ’ला भाजप नाराजांची मदत?

१९९५ पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघावर पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आता भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजपा, असा विविध पक्षांचा राजकीय प्रवास केला आहे. पक्ष बदलले तरी शिर्डी विधानसभेतून राधाकृष्ण विखे पाटील आमदार म्हणून सातत्याने निवडून येत राहिले.

कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा पद्मश्री. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ३१ डिसेंबर १९५० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. यानंतर त्यांनी १९६४ साली ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. सहकार, शिक्षण क्षेत्राबरोबरच ‘प्रवरा मेडिकल’ची स्थापना करून त्यांनी आरोग्य क्षेत्रातही योगदान दिले. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी विठ्ठलरावांचा आदर्श पुढे नेत असताना संस्था तर टिकल्याच त्याशिवाय राजकारणातही पाऊल रोवले. त्यांनी ४० वर्ष खासदार राहण्याचा मान मिळविला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवजड उद्योग खात्याचा पदभार सांभाळला होता.

आपल्या वडिलांप्रमाणेच राधाकृष्ण विखे पाटील ३० वर्षांपासून शिर्डी विधानसभेत आपले वर्चस्व राखून आहेत. मात्र यंदा त्यांच्या वर्चस्वाला प्रथमच धक्का बसला.

राजकारणाची हवा ओळखून निर्णय घेण्यात विखे पाटील घराण्याने नेहमीच वेगळी वाच चोखाळली. विखे पाटील यांचे समकालीन असलेले जिल्यातील नेते बाळासाहेब थोरात यांनी कधीच काँग्रेसची साथ सोडली नाही. २०१४ साली सत्ता गेल्यानंतर अनेक नेत्यांना डावलून राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसने विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद दिले. मात्र विखे पाटील यांनी २०१९ साली मुलगा सुजय विखे पाटीलला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली तसेच शिर्डी विधानसभेतून ६० हजारांचे लीड दिले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला आणि मंत्रीपदही मिळवले. एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यानंतर ते दुसरे नेते ठरले.

हे ही वाचा >> राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाला धक्का

शिर्डीत कुणाचे पारडे जड?

राज्यात मंत्रिपदी असताना विखेंनी आपला मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे व पुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी पराभव केला. त्यामुळे डॉ. विखे यांनी पुन्हा आपले लक्ष शिर्डी मतदारसंघावर केंद्रित केले आहे.

शिर्डी गड काबीज करण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार थोरात यांनी मंत्री विखे विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यंदा त्याला यश लाभेल का, याचीच उत्सुकता आहे. माजी मंत्री आमदार थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व भाजपमधील काही नाराज नेत्यांना बरोबर घेऊन मंत्री विखेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. यापूर्वीच्याही निवडणुकीत सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र विरोधकांचा एकसंधपणा टिकला नाही. शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचा विखे यांच्या विरोधात उमेदवार कोण आहे किंवा कुठल्या पक्षाचा असेल याची अद्यापि वाच्यता ‘मविआ’कडून झालेली नाही.

२०१९ साली विधानसभा निवडणुकीचा निकाल:

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही तगडा उमेदवार नव्हता. या निवडणुकीत विखे पाटील यांनी एक लाख ३२ हजार ३१६ मते मिळविली. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या सुरेश जगन्नाथ थोरात यांनी ४५ हजार २९२ मते मिळविली. तब्बल ८७ हजार मताधिक्यांनी विखे पाटील यांनी मोठा विजय मिळविला.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीचा निकाल:

राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस) – १ लाख २१ हजार ४५९ मते

अभय दत्तात्रय शेळके पाटील ( शिवसेना ) – ४६ हजार ७९७ मते

राजेंद्र गोदकर पाटील ( भाजप) – १७ हजार २८३ मते

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आमदारः

अकोले – डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट),

संगमनेर – बाळासाहेब थोरात (काँग्रेस),

कोपरगाव – आशुतोष काळे (राष्ट्रवादी,
अजितदादा गट),

शिर्डी – राधाकृष्ण विखे (भाजप),

श्रीरामपुर – लहू कानडे (काँग्रेस),

नेवासा – शंकरराव गडाख (अपक्ष, ठाकरे गट)

शिर्डी विधानसभेत २०२४ चे उमेदवार कोण?

शिर्डी विधानसभेसाठी भाजपाने ज्येष्ठ नते राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली गेली आहे. लोणी खुर्द गावच्या लोकनियुक्ती सरपंच असलेल्या घोगरे यांना थेट विधानसभेचे तिकीट दिले गेले आहे. विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे.

Shirdi seat congress candidate Prabhavati Ghogare
काँग्रेसच्या शिर्डी विधानसभेच्या उमेदवार प्रभावती घोगरे

वंचित बहुजन आघाडीकडून राजू शेख, मनसेकडून राजेश लुटे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यांचा अर्ज बाद झाला आहे. शिर्डीमध्ये एकूण २५ जणांनी अर्ज भरला होता. त्यापैकी चार अर्ज बाद झाले आहेत.

ताजी अपडेट

शिर्डी विधानसभेसाठी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या आहेत.

https://x.com/RVikhePatil/status/1856801462631780539

पंतप्रधान मोदींनी आपल्या सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते आरक्षण विरोधी असल्याचे म्हटले होते. या टीकेला प्रियांका गांधी यांनी जोरदार उत्तर दिले.

मतदानाच्या दिवशी काय घडले?

शिर्डी विधानसभेसाठी मतदान संपन्न झाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यात मोडतो. अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ६१.९५ टक्के इतकी होती. मतदानाच्या दिवशी शिर्डी विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कॉलेजमधील मुलांनी बोगस मतदान केल्याचा आरोप घोगरे यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

Story img Loader