लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होत आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज मविआ आणि महायुतीच्या जाहीर सभा होत आहेत. बीकेसी येथील मैदानात इंडिया आघाडीची सभा होत आहे, तर दादरच्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होत आहे. बीकेसीच्या सभेत बोलत असताना शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. “४ जून नंतर मोटा भाई, छोटा भाई सर्व जण जाणार आहेत. या सभेला अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह येत आहेत. दोघेही तुरुंगातून सुटून येत आहे. मीही काही काळापूर्वी तुरुंगातून बाहेर आलो आहे. आता तुरूंग भाजपाच्या नेत्यांची वाट पाहत आहे. ईडी, सीबीआय आणि त्या कोठड्या भाजपाच्या नेत्यांची वाट पाहत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांचा आत्मा तुम्हाला शाप देईल

संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपा हा एक चोरबाजार आहे. या बाजारात फक्त चोरीचा माल मिळतो. पंतप्रधान मोदी हे शिवतीर्थावर गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन करणार असल्याचे समजचे. आमचे आवाहन आहे की, तुम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ नका. नाहीतर बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होतील. ज्या मोदींनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली-फोडली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली बोलण्याचे पाप केले, त्या मोदींनी स्मृतीस्थळावर जाऊन दुसरे पाप करू नये. बाळासाहेबांचा आत्मा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही.

leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

मोदींची रवानगी वृद्धाश्रमात करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे शेतकरी, युवक त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे मोदींनी पाकिस्तान, हिंदू-मुस्लीम हा त्यांचा आवडीचा विषय बाहेर काढला आहे. त्यामुळे आपण त्या विषयात न जाता लोकांच्या प्रश्नांवर बोलत राहुया. नरेंद्र मोदी लवकरच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यांची वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात उत्तम वृद्धाश्रम आहेत. तिथे मोदींची रवानगी केल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

Story img Loader