Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ३१ नावांचा समावेश आहे.

CM Eknath Shinde Announcement About First List Candidates For Vidhansabha Election
एकनाथ शिंदे यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट करत ही माहिती त्यांनी दिली आहे. (फोटो-एकनाथ शिंदे-एक्स पेज)

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे आणि सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीच्या जागावाटपाचं काम जवळपास होत आलं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाने ९९ जागांची यादी जाहीर केली. तर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यादीत कुणाची नावं आहेत?

एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी
मंजुळाताई गावित,साक्री
चंद्रकांत सोनवणे,चोपडा
गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
अमोल पाटील, एरंडोल
किशोर पाटील, पाचोरा
चंद्राकांत पाटील, मुक्ताईनगर
संजय गायकवाड, बुलढाणा
संजय रायमुलकर, मेहकर
अभिजित अडसूळ, दर्यापूर
आशिष जैस्वाल, रामटेक
नरेंद्र भोंडेकर, भंडारा
संजय राठोड, दिग्रस
बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर
संतोष बांगर, कळमनुरी
अर्जुन खोतकर, जालना<br>अब्दुल सत्तार, सिल्लोड
प्रदीप जैस्वाल, छ. संभाजीनगर मध्य
संजय शिरसाट, छ. संभाजीनगर पश्चिम
विलास संदिपान भूमरे, पैठण
रमेश बोरनारे, वैजापूर
दादा भुसे, मालेगाव बाह्य
प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा
प्रकाश सुर्वे, मागाठाणे
मनिषा वायकर, जोगेश्वरी पूर्व
दिलीप लांडे, चांदिवली
मंगेश कुडाळकर, कुर्ला
सदा सरवणकर, माहीम
यामिनी जाधव, भायखळा
महेंद्र थोरवे, कर्जत
महेंद्र दळवी, अलिबाग
भरतशेठ गोगावले, महाड
ज्ञानराज चौगुले, उमरगा
तानाजी सावंत, परांडा
शहाजीबापू पाटील, सांगोला
महेश शिंदे, कोरेगाव
योगेश कदम, दापोली
शंभूराज देसाई, पाटण
उदय सामंत, रत्नागिरी
किरण सामंत, राजापूर
दीपक केसरकर, सावंतवाडी
प्रकाश आबिटकर, राधानगरी
चंद्रदीप नरके, करवीर
सुहास बाबर, खानापूर

Ganesh Naik and Sandeep Naik
Sandeep Naik : वडिलांना उमेदवारी मिळाली तरी पुत्र नाराज; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या संदीप नाईकांचा प्रचार गणेश नाईक करणार का?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Bachchu Kadus reaction to BJP candidate from Achalpur
अचलपूरच्या भाजप उमेदवाराबद्दल बच्चू कडू म्हणाले, “निष्ठावंतांना डावलून…”
Ulhasnagar BJPs Kumar Ailani on waiting list Ailani is not a candidate in the first list
उल्हासनगरचे कुमार आयलानी वेटिंगवर, पहिल्या यादीत आयलानी यांना उमेदवारी नाहीच
After losing in the Lok Sabha the assembly election 2024 is expected
लोकसभेतील पराभूतांना विधानसभेचे वेध!
Assembly election 2024 Rahul Awade BJP candidate from Ichalkaranji Kolhapur news
हाळवणकरांना विधान परिषदेला संधी, इचलकरंजीत राहुल आवाडे; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Vijay Shivtare Told The Reason About Sunetra Pawar Defeat in Loksabha Election
Vijay Shivtare : बारामतीत सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक का हरल्या? चार महिन्यांनी विजय शिवतारेंनी नेमकं काय सांगितलं?
Wardha, interview Congress candidates,
काँग्रेस मुलाखती ! अपेक्षित ते आलेच नाही, तर आलेल्यांची फिरकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या विजयी शुभेच्छा!

अशी ४५ नावं जाहीर कऱण्यात आली आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा. अशी पोस्टही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे.

एकनाथ शिंदे यांचं बंड चर्चेत राहिलं

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेतून बाहेर पडत थेट उद्धव ठाकरेंच्या विरोधात दंड थोपटले. एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड होतं. कारण त्यांच्यासह ४० आमदार बाहेर पडले. त्यातल्या बऱ्यापैकी अनेक चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर त्यांनी धडाडीचे निर्णय घेऊन महाराष्ट्राचं हित आम्ही कसं साधलं ते सांगितलं आहे. आता या यादीत बंडात साथ दिलेल्या जवळपास सगळ्यांचीच नावं यादीत समाविष्ट केली आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena eknath shinde announced first list of candidates who contest vidhansabha election of maharashtra scj

First published on: 22-10-2024 at 23:43 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या