Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या ४० बंडखोरांचं काय झालं? किती जिंकले, किती पडले? वाचा संपूर्ण यादी

Eknath Shinde Shivsena Rebel Candidates Winner List : एकनाथ शिंदेंबरोबर ४० आमदारांनी बंडखोरी केली होती.

Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
शिवसेना एकनाथ शिंदे बंडखोर उमेदवार विजयी यादी (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rebel Winner Candidates of Shivsena Eknath Shinde : जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तसेच त्यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. नंतर या महायुतीत अजित पवारांच्या गटानेही प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी-शरद पवार) असा संघर्ष होईल असं बोललं जात होतं. एक्झिट पोल्समध्ये देखील असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, महायुतीने या निवडणुकीत सोपा विजय मिळवला आहे. महायुतीने सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीची गाडी ६० जागांच्या पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीच्या नेत्यांची कॉलर टाईट झाली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या ४० आमदारांचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकनाथ शिंदेंबरोबर मुंबई सोडून, सुरत व नंतर गुवाहाटीला गेलेले व तिथून परत मुंबईत येऊन थेट सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या ४० आमदारांपैकी किती जणांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं होतं, त्यापैकी किती जण जिंकले व किती जण पराभूत झाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
Kalyan East Shiv Sena appoints Nilesh Shinde as city chief
कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची नियुक्ती
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”

हे ही वाचा >> Mumbai Konkan Region Election Results 2024 Live Updates : शपथविधीची तारीख व ठिकाणही ठरलं, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित जागेची निवड

बंडखोरांचे निकाल

उमेदवाराचं नावनिवडणुकीचा निकाल
1) एकनाथ शिंदे (मंत्री)विजयी
2) अनिल बाबरमुलगा सुहास बाबर यांना उमेदवारी दिली (विजयी)
3) शंभूराजे देसाई (मंत्री)विजयी
4) महेश शिंदेआघाडीवर
5) शहाजी पाटीलआघाडीवर
6) महेंद्र थोरवेविजयी
7) भरतशेठ गोगावलेविजयी
8) महेंद्र दळवीविजयी
9) प्रकाश अबिटकरविजयी
10) डॉ. बालाजी किणीकरविजयी
11) ज्ञानराज चौगुलेपराभूत
12) प्रा. रमेश बोरनारेविजयी
13) तानाजी सावंतविजयी
14) संदीपान भुमरे (मंत्री)खासदार झाले
15) अब्दुल सत्तार</td>आघाडीवर
16) प्रकाश सुर्वेविजयी
17) बालाजी कल्याणकरविजयी
18) संजय शिरसाठविजयी
19) प्रदीप जयस्वालविजयी
20) संजय रायमुलकरपराभूत
21) संजय गायकवाडविजयी
22) विश्वनाथ भोईरविजयी
23) शांताराम मोरेविजयी
24) श्रीनिवास वनगातिकीट नाकारलं
25) किशोरअप्पा पाटीलपराभूत
26) सुहास कांदेविजयी
27) चिमणआबा पाटीलमुलगा अमोल पाटील यांना उमेदवारी दिली (विजयी)
28) सौ. लता सोनावणेविजयी
29) प्रताप सरनाईकविजयी
30) सौ. यामिनी जाधवपराभूत
31) योगेश कदमविजयी
32) गुलाबराव पाटील (मंत्री)विजयी
33)राजेंद्र यड्रावकरविजयी
34) मंगेश कुडाळकरविजयी
35) सदा सरवणकरपराभूत
36) दीपक केसरकरविजयी
37) दादा भुसे (मंत्री)विजयी
38) संजय राठोडविजयी
39) उदय सामंत (मंत्री)विजयी
40) मंजुळा गावितविजयी

पाच बंडखोर आमदार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena eknath shinde rebel candidates election results maharashtra assembly election 2024 asc

First published on: 23-11-2024 at 18:06 IST

संबंधित बातम्या