शिवसेना एकनाथ शिंदे बंडखोर उमेदवार विजयी यादी (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Rebel Winner Candidates of Shivsena Eknath Shinde : जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तसेच त्यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. नंतर या महायुतीत अजित पवारांच्या गटानेही प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी-शरद पवार) असा संघर्ष होईल असं बोललं जात होतं. एक्झिट पोल्समध्ये देखील असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, महायुतीने या निवडणुकीत सोपा विजय मिळवला आहे. महायुतीने सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीची गाडी ६० जागांच्या पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीच्या नेत्यांची कॉलर टाईट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
दरम्यान, शिवसेना पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या ४० आमदारांचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकनाथ शिंदेंबरोबर मुंबई सोडून, सुरत व नंतर गुवाहाटीला गेलेले व तिथून परत मुंबईत येऊन थेट सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या ४० आमदारांपैकी किती जणांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं होतं, त्यापैकी किती जण जिंकले व किती जण पराभूत झाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.