मतदान संपताच अपक्षांचा भाव वधारला, महायुतीकडून जुळवाजुळव सुरू? शिवसेना नेते म्हणाले, “दोन-चार…”

ShivSena Shinde : राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde
सहा एक्झिट पोल्सचे अंदाज महायुतीच्या बाजूने आहेत. (PC : Eknath Shinde FB)

Maharashtra Assembly Election 2024 independent MLA’s : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, खरी लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन प्रमुख घटक पक्ष आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर सरकार कुणाचं येईल हे ओघाने समोर येईलच. तत्पूर्वी मतदानानंतर निवडणुकीच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. राज्यात जे १० प्रमुख एक्झिट पोल जाहीर झाले त्यापैकी सहा पोल्समध्ये राज्यात महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तीन पोल्समध्ये महाविकास आघाडीला सत्ता मिळेल असा दावा करण्यात आला आहे. एका पोलनुसार राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, या एक्झिट पोल्सवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच बहुमताच्या जवळपास पोहोचल्यास सत्ता कशी मिळवता येईल याबाबत सर्वच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. यावर शिवसेनेचे (शिंदे) प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले, “मला पूर्ण खात्री आहे की राज्यात महायुतीचीच सत्ता येईल”. दरम्यान, अनेक एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार सत्तास्थापनेत अपक्ष आमदारांची भूमिका देखील महत्त्वाची असेल असं दिसतंय. याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कोणत्याही निवडणुकीनंतर राज्यात २० ते ३० अपक्ष आमदार असतातच. या अपक्षांपैकी बहुसंख्य नेते हे वेगवेगळ्या पक्षांमधील बंडखोर असतात. कोणलाही बहुमत मिळालं नाही तर अपक्षांची गरज भासते. कोणताही पक्ष बहुमताच्या जवळ गेल्यावर अपक्ष आमदार त्या पक्षाच्या बाजूने आपला कल झुकवतात. ते आमदार तातडीने बहुमताजवळ पोहोचलेल्या पक्षाशी किंवा आघाडीशी संलग्न होतात. मला खात्री आहे की राज्यात महायुतीचं बहुमताचं सरकार येईल. परंतु, सत्तास्थापनेसाठी दोन-चार आमदारांची गरज पडली तर अपक्ष आमदार आम्हाला सहकार्य करतील. आम्ही अपक्ष आमदारांचं सहकार्य घेऊन सत्तास्थापन करू”. संजय शिरसाट टीव्ही९ मराठीशी बातचीत करत होते.

no alt text set
Assembly Election : निवडणूक निकालाआधी संजय निरूपम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; म्हणाले, “राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आवश्यक, कारण…”
Devendra Fadnavis
Pravin Darekar : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आमच्या…
Jharkhand Election Results 2024 Live Updates
Jharkhand : झारखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री आघाडीवर, JMM आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत!
Nanded Bypoll Election Result 2024 ravindra chavan
Nanded Bypoll Election Result 2024 : सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होणार का ? अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभेची मतमोजणी सुरु असतानाच रामदास आठवलेंनी केला मोठा दावा; म्हणाले, “डंके की चोट पे…”

हे ही वाचा >> अदाणी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!

महायुतीकडून अपक्षांची जुळवाजुळव?

दरम्यान, संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं की तुम्ही (शिवसेनेने) एक्झिट पोल्सचा अंदाज घेऊन आत्तापासूनच अपक्षांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे का? यावर संजय शिरसाट म्हणाले, राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख नेते अशा प्रकारची जुळवाजुळव करतच असतात. एकंदरित किती अपक्ष आमदार आहेत? कोणत्या पक्षाची काय परिस्तिती आहे? कोण बहुमताच्या आसपास पोहोचलंय? याचा विचार करून पक्ष व त्यांचे प्रमुख नेते अपक्ष आमदारांशी संपर्क साधतात हे नाकारून चालणार नाही. मात्र काही अपक्ष आमच्या संपर्कात आधीपासूनच आहेत.

हे ही वाचा >> “आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही”, एक्झिट पोल पाहून शिंदे-फडणवीसांच्या मित्राने शड्डू ठोकला

राज्यात महायुतीचं सरकार येईल – संजय शिरसाट

संजय शिरसाट म्हणाले, “एक गोष्ट मी इथे नमूद करेन की एक्झिट पोल पाहून सगळे अंदाज बांधले जात नाहीत. अपक्ष आमच्या बाजूने असले किवा नसले तरी २३ नोव्हेंबर रोजी आमच्या बाजूनेच निकाल लागेल आणि आम्ही राज्यात बहुमताचं सरकार स्थापन करू. तुम्हाला राज्यात महायुतीची सत्ता दिसेल”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena shinde mla sanjay shirsat says independent candidates with mahayuti maharashtra assembly election 2024 asc

First published on: 21-11-2024 at 16:18 IST

संबंधित बातम्या