Sanjay Raut : “महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, भाजपाला हरवायचं असेल तर…”; संजय राऊत यांचं वक्तव्य

खासदार संजय राऊत यांचा काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला

Sanjay Raut
खासदार संजय राऊत, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Sanjay Raut महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेलं नाही. जागावाटपावरुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष यांच्यात काही प्रमाणात मतभेद झाल्याची चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले जागा वाटपाची गाडी अडली आहे. भाजपाला हरवायचं असेल तर लवकरात लवकर जे काही पेच असतील ते सोडवले पाहिजेत. तसंच काँग्रेसला त्यांनी एक सल्लाही दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने व्हावी आणि तातडीने निर्णयापर्यंत येण्याची गरज आहे. मला कारणांमध्ये पडायचं नाही पण नक्कीच २०० पेक्षा जास्त जागांवर आमची सहमती आहे. उरलेल्या जागांचा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात माझी आज उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. कुणाच्या काय भूमिका आहेत हे त्यांना सांगितलं आहे. आज सकाळी मी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे रमेश चेन्नीथेला यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींशीही मी चर्चा करणार आहे. काही जागांवर गाडी अडली आहे त्यातून ब्रेक निघाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे.” असं संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

Bhandara, Congress-Pawar group Bhandara,
भंडारा : चरण वाघमारेंच्या ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस-पवार गटाचे नेते आक्रमक; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
BJP first list of candidates for assembly elections 2024 print politics news
भाजपची पहिली यादी आज; महायुतीच्या जागावाटपाचा तिढा केंद्रीय नेतृत्वापुढे
Baba Siddique firing, What Doctor Jalil Parkar Said?
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींना छातीवर दोन गोळ्या लागल्या, ज्या…” ; डॉ. जलील पारकर यांची महत्त्वाची माहिती
Ramraje Nimbalkar, Ajit pawar NCP, NCP,
रामराजे निंबाळकर पक्षातच; कार्यकर्ते मात्र ‘तुतारी’ घेणार
Satyasheel Sherkar of Congress is the candidate of NCP Sharad Pawar party in Junnar
जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूकही लढवणार
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत

सगळ्यांनाच पक्ष टिकवायचे आहेत तेव्हा…

महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सगळ्यांना पक्ष चालवायचे आहेत आणि टिकवायचे आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन जास्त खेचाखेची बरी नाही हे आम्हालाही माहीत आहे. निर्णय लवकर झाले पाहिजेत कारण भाजपाचा आम्हाला पराभव करायचा आहे. भाजपाशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात भाजपा, अमित शाह आणि मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्या भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. आम्ही सगळा त्रास सहन करुन आम्ही उभे आहोत. असंही राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यात…

काँग्रेसची एक यंत्रणा आहे, त्यांना यादी दिल्लीला पाठवावी लागते. आमचं असं म्हणणं आहे की हे निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगाने होतील. शिवसेना, राष्ट्रवादी यांचे पक्ष महाराष्ट्रात आहेत. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आहे की तातडीने निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं दिसतं आहे.तसंच आम्ही हे सांगू इच्छितो, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काही स्वतंत्र संस्थान नाही. रामटेकसारखी सहावेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा काँग्रेसला दिली. आम्ही आता अपेक्षा ठेवल्या तर चुकीची आहे असं वाटत नाही.आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात. जे रामटेकच्या बाबतीत आहे तेच अमरावतीच्या बाबतीत आहे. असंही संजय राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगाने काही काही निर्णय घेतले आहेत जे सत्ताधाऱ्यांना धार्जिणे आहेत. आम्ही त्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना काही गोष्टी लक्षात आणून देणार आहोत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena ubt mp sanay raut taunts congress about vidhan sabha seat sharing scj

First published on: 18-10-2024 at 12:01 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या