लोकसभा निवडणुकीचा उत्सव देशभरात सुरु आहे. पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. तर पुढचा टप्पा २६ एप्रिलला पार पडणार आहे. अशात प्रचारसभांचा जोर सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळेल असं म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना किती जागा जिंकेल हे देखील सांगितलं आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

मी संसद अभ्यासली, विधीमंडळाचा अभ्यास केला. पूर्वीसारखी भाषणं, अभ्यास लुप्त झाला आहे. आता फक्त शिवराळपणा उरला आहे. तसंच संजय राऊत यांचं नवनीत राणांबाबतचं वक्तव्य मी जेव्हा मोबाइलवर पाहिलं तेव्हा मला राहत इंदौरींची कविताही सापडली, बुलाती है मगर जाने का नहीं असं म्हणत सुषमा अंधारेंनी त्या वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी हे वक्तव्य केलं.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची आक्रमक भाषेत टीका, “दिला नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, ही मोदींची अवस्था”

नीलम गोऱ्हे खुर्ची वाचवण्यासाठी गेल्या

सुषमा अंधारे म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामुळे शिवसेना सोडली नाही, त्यांना त्यांची खुर्ची वाचवायची होती. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी आमच्याकडची संख्या कमी होती. अशा वेळी त्यांना त्यांची जागा सुरक्षित करण्यासाठी तिकडे जाणं महत्वाचं होतं त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला. अजित पवार अशावेळी निंबाळकरांना तिथे बसवू शकत होते. फडणवीसांना ते मान्य नव्हते. त्यानंतर मग नीलम गोऱ्हे तिकडे शिफ्ट झाल्या. आमदारकी ,खासदारकी पेक्षा मी माझा सेल्फ रिस्पेक्ट ठेवणाऱ्या लोकांपैकी आहे. माझं काही काम करायचं असेल आणि मी मेसेज टाकला तर शिवसेनेकडून दोन तासांत ते काम होतं असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

ठाकरेंची शिवेसना किती जागा जिंकणार?

“महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी शिवसेना आणि उद्धव ठाकरे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३ किंवा त्याहून जास्त जागा मिळतील असा मला विश्वास आहे.” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

Story img Loader