Premium

Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 : धक्कादायक निकाल; उत्तर पश्चिम लोकसभेत रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी

Mumbai Lok Sabha Election Result 2024, Ravindra Waikar vs Amol Kirtikar : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभेत धक्कादायक निकाल लागला आहे. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर केवळ ४८ मतांनी विजयी झाले आहेत.

Ravindra Waikar Won Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 against Amol Kirtikar
शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा केवळ ४८ मतांनी निसटता विजय झाला आहे.

Ravindra Waikar Won Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आधी ४८ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या २६ फेऱ्या झाल्या, तसेच टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल गजानन किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर ४८ मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले, तरी…”

उत्तर पश्चिम लोकसभेची मतमोजणी गोरेगावच्या नेस्को मैदानात सुरू आहे. याठिकाणी आता दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांची गर्दी जमू लागली आहे. अमोल किर्तीकर हे फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. मतमोजणीत छेडछाड झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. गर्दी वाढू लागल्यामुळे पोलिसांकडून याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी

Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवाराला फक्त २०१ मतं, लाजिरवाणा पराभव

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेतला मतदारसंघ ठरला होता. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला. किर्तीकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप करून संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. तसेच उत्तर पश्चिम लोकसभेत उमेदवार देण्यावरून शिंदे गटाने बराच वेळ घेतला. अखेर रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.

दरम्यान रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करायचा नव्हता, असे त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. “मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते. त्यामुळे जड अंतःकरणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर तर दबाव होताच, पण माझ्या पत्नीचेही नाव गोवल्यांतर माझ्यापुढे पर्याय उरला नाही”, अशी भूमिका वायकर यांनी मांडली होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shocking results shinde group candidate ravindra waikar won by only 48 votes ubt candidate amol kirtikar narrowly lost kvg

First published on: 04-06-2024 at 20:03 IST
Show comments