मुलासाठी आईची माघार.. भाजपचा एबी फॉर्म आईने दिला मुलाला

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

Shrigonda Vidhan Sabha Constituency, Pratibha Pachpute,
मुलासाठी आईची माघार.. भाजपचा एबी फॉर्म आईने दिला मुलाला (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाचे आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आज प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी दिली. पक्षाचा एबी फॉर्म देखील विक्रम सिंह पाचपुते यांना मिळाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार या मतदारसंघामध्ये बदलला असला तरी यामध्ये आईने मुलासाठी आपली उमेदवारी मागे घेतले आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माजी आमदारांची बंडखोरी

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी मात्र बंडखोरी केली आहे, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो परत घेतला नाही. पक्षाकडून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत आदेश येऊनही त्याचे पालन राहुल जगताप यांनी केले नाही. यामुळेच या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे व राहुल जगताप हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाले आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

लोकसभेला भाजप विधानसभेला वंचित आघाडी

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णासाहेब सिताराम शेलार हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे व्यासपीठावर जाऊन उघडपणे काम केले होते. मात्र यावेळी त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे, यामुळे महायुती देखील या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.

हेही वाचा – Raj Thackeray Speech : “शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी, राष्ट्रवादी शरद पवारांचं अपत्य”, पक्षफुटीवरून राज ठाकरेंनी शिंदे-अजित पवारांना केलं लक्ष्य!

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, यामध्ये आठ उमेदवार पक्षाचे असून आठ उमेदवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेकरंगी लढत या मतदारसंघामध्ये होत आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shrigonda vidhan sabha constituency pratibha pachpute nomination form vikram singh pachpute ssb

First published on: 04-11-2024 at 20:16 IST