Shrikant Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर ठाण्यात २७ तारखेला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे ज्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं, जे निर्णय घेतले त्यामुळे झालं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखलं. मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, रडणारे नाही तर लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन. असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. यानंतर आता वडील एकनाथ शिंदे यांच्यासाठी श्रीकांत शिंदेंनी ( Shrikant Shinde ) पोस्ट लिहिली आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका

श्रीकांत शिंदेंची पोस्ट काय?

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

हे पण वाचा- Ajit Pawar : एकनाथ शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ अजित पवारांनी कशी संपवली? शरद पवारांच्या पावलावर पाऊल कसं ठेवलं?

सत्ता आणि पद भल्याभल्यांना मोहात पाडतंं पण..

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.

खूप अभिमान वाटतो बाबा!

अशी पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी लिहिली आहे. श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) हे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. तसंच एकनाथ शिंदेंचे सगळे निकटवर्तीय आमदारही उपस्थित होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे इच्छुक आहेत या चर्चाही घडल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मी सर्वाधिकार देतो आहे. मोदी जे नाव जाहीर करतील ते मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसतील अशी चर्चा सुरु झाली आहे.