अलिबाग : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले, माजी आमदार मुश्ताक अंतुले, अनिकेत तटकरे उपस्थित होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात आदिती तटकरे यांनी एकूण ३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. २०१९ च्या तुलनेत आदिती तटकरे यांच्या मालमत्तेत तीन कोटींची वाढ झाली आहे.

आदिती तटकरे यांनी शक्तीप्रदर्शन करत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी महायुतीच्या तिनही पक्षाचे नेते उपस्थित होते, महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी काढलेल्या रॅलीत सहभागी झाला होता. श्रीवर्धनचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात आदिती तटकरे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले. यात त्यांच्याकडे ११ लाख ३९ हजार रुपयांचे दागिने, तर रोहा तालुक्यातील दुरटोली येथे १२ एकर १६ गुंठे शेतजमिन असल्याचे नमुद केले आहे. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचेही शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Amit Thackeray and Uddhav Thackeray
Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
Ashish Shelar On Amit Thackeray
Ashish Shelar : महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? आशिष शेलारांचं मोठं विधान; म्हणाले, “समर्थन देण्याची…”
Shekhar Pramod Shende of Congress has been nominated by Mahavikas Aghadi in Wardha Constituency
शेखर शेंडेंना काँग्रेसकडून उमेदवारी; पण शरद पवार गटाने व्यक्त केली ‘ही’ शक्यता
Jayashree Thorat and Sujay Vikhe Patil
Sangamner News Update: “माझ्या मुलाच्या सभेत विकृती…”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर सुजय विखेंच्या आई शालिनी विखे संतापल्या
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Kavathe Mahankal Assembly constituency
अजित पवारांच्या खेळीमुळे आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटलांसमोर तगडे आव्हान
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा

हे ही वाचा… जयंत पाटील यांच्या संपत्तीत ३३ लाखांची वाढ

आदिती तटकरे यांनी 2019 मध्ये निवडणूक आयोगालाच सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 39 लाख रुपये असल्याचं नमूद केला होत. पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत तीन कोटींची भर पडली आहे. त्यांची स्थावर मालमत्ता २ कोटी १६ लाख ५४ हजार एवढी असून, जंगम मालमत्ता १ कोटी २४ लाख ७६ हजार इतकी असल्याचे यावर्षी सादर केलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. शेती व्यवसाय असलेल्या अदिती तटकरे यांचे एमए पर्यंत शिक्षण झाले असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.