Madhya Pradesh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : गेली दोन दशके मध्य प्रदेशात सत्तेवर असलेल्या भाजपाने पुन्हा एकदा २०२३ मध्ये सत्ता काबिज केली आहे. सत्तास्थापनेसाठी लागणारा बहुमाताचा आकडाही भाजपाने गाठल्याने येथे भाजपाची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी, भाजपाने १६३ जागांवर विजय मिळवला असून काँग्रेस ६६ जागांवर यशस्वी झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी अटतटीची लढत झाली होती. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती. परंतु, दीड वर्षांच्या कार्यकाळातच काँग्रेसची सत्ता उलथवून लाणवण्यात भाजपाला यश आलं आणि शिवराज सिंग यांची सत्ता स्थापन झाली. भाजपाचा चोख प्रचार कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा, ओबीसी-दलित-आदिवासी समाजातील पारंपरिक मते आणि महिला वर्गाचा मोठा पाठिंबा यामुळे मध्य प्रदेशात ‘कमळा’ची मुळे पुन्हा एकदा घट्ट झाली आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश कसे मिळाले?

गेली १५-१६ वर्षे शिवराज सिंह राजस्थानचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परंतु, आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलण्याची मागणी जोर धरू लागली. लाडली बेहना व्यतिरिक्त सिंह यांनी फारशी कामगिरी केली नसल्याने त्यांच्याविरोधातील जनमत वाढत होते. परिणामी, भाजपानेही रणनीती आखत या निवडणुकीतून शिवराज सिंह यांना अंशतः लांबच ठेवले. भाजपच्या जनसंपर्क यात्रांचे नेतृत्वही अन्य नेते करताना दिसत होते. मात्र, शिवराजसिंह स्वतंत्रपणे पक्षाचा प्रचार करत होते, त्यांच्या प्रचाराला महिला मतदारांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.

हेही वाचा >> MP Election Result : ‘लाडली लक्ष्मी’, ‘लाडली बहना’ आणि हिंदुत्वाचा हुंकार, ब्रँड शिवराज यांचा चमत्का

एग्झिट पोलच्या अंदाजानुसार जास्त मते

एग्झिट पोलनुसार काँग्रेस आणि भाजपात टफ फाईट होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही पक्ष १०० च्या वर जागा मिळवतील, परंतु स्पष्ट बहुमत कोणाच्याही पारड्यात नसेल असा अंदाज होता. परंतु, प्रत्यक्षात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. एग्झिट पोलच्या आकेडवारीत भाजपाला सर्वाधिक १२३ जागा मिळतील असा अंदाज होता. जन की बातच्या एग्झिट पोलनुसार भाजपा १०० ते १२३ आणि काँग्रेस १०२ ते १२५, टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्टनुसार भाजपा १०६ ते ११६ आणि काँग्रेस १११ ते १२१, रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिजनुसार भाजपा ११८ ते १३० आणि काँग्रेस ९७ ते १०७, दैनिक भास्करच्या अंदाजानुसार भाजपा ९५ ते ११५ आणि काँग्रेस १०५ ते १२० जागा मिळवण्याची अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात भाजपाने १६३ जागांवर मुसंडी मारून बहुमताचाही आकडा पार केला. तर, काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावं लागलं. तर, भारत आदिवासी पक्षाला १ जागा मिळाली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Single handed victory of bjp exit poll predictions are also false how many seats in whose account sgk
Show comments