Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली आहे. २३ तारखेला मतमोजणी होईल आणि सरकार कुणाचं येणार? हेदेखील स्पष्ट होईल. दरम्यान एक्झिट पोल ( Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 ) जाहीर झाले आहेत. १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तर एका तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. एक एक्झिट पोल (Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024) म्हणतोय की त्रिशंकू अवस्था होईल. नेमकं काय घडणार? ते चित्र २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इलेक्ट्रोल एज एक्झिट पोल काय सांगतो?

महायुती -११८ जागा
महाविकास आघाडी १५० जागा

पोल डायरी एक्झिट पोल

महायुती -१२२ ते १८६
महाविकास आघाडी- ६९ ते १२१

चाणक्य एक्झिट पोल

महायुती १५२ ते १६० जागा
महाविकास आघाडी -१३० ते १३८ जागा

मॅट्रिझचा एक्झिट पोल

महायुती १५० ते १७० जागा
महाविकास आघाडी – ११० ते १३० जागा

पी मार्क्यू एक्झिट पोल

महायुती-१३७ ते १५७ जागा
महाविकास आघाडी- १२६ ते १४६ जागा

रिपब्लिक एक्झिट पोल

महायुती- १३७ ते १५७ जागा
महाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा

SAS एक्झिट पोल

महायुती – १२७ ते १३५ जागा
महाविकास आघाडी- १४७ ते १५५ जागा

हे पण वाचा- Maharashtra Election Exit Poll, Constituency Wise Exit Poll Results Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतदारसंघनिहाय एक्झिट पोल

पिपल्स पल्स एक्झिट पोल

महायुती १७५ ते १९५ जागा
महाविकास आघाडी-८५ ते ११२ जागा
इतर- ७ ते १२ जागा

भास्कर रिपोर्टर्स पोल

महायुती- १२५ ते १४० जागा
महाविकास आघाडी १३५ ते १५० जागा

लोकशाही महारुद्र

महायुती-१२८ ते १४२ जागा
महाविकास आघाडी- १२५ ते १४० जागा
इतर – १८ ते २३ जागा

दहापैकी सहा एक्झिट पोल्स महायुतीच्या बाजूने

असे हे दहा एक्झिट पोल ( Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 ) आहेत. यापैकी सहा पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर लोकशाही महारुद्रच्या पोलने राज्यात त्रिशंकू अवस्था असेल आणि अपक्ष किंवा बंडखोरांच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील असा अंदाज वर्तवला आहे. प्रत्यक्षात काय होणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रात यावेळी पार पडलेली निवडणूक वेगळी

महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक वेगळी ठरली आहे. कारण यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. इतके दिवस जे चार प्रमुख पक्ष होते त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आहेत. आता एक्झिट पोल्सच्या ( Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 ) अंदाजानुसार महायुतीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नेमकं काय घडतं ते २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six exit polls predicts mahayuti will form the government in maharashtra scj