India Lok Sabha Election 2024 Phase 6 Voting Updates, 25 May: छत्तीसगडसह देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ मतदारसंघांमध्ये आज सहाव्या टप्प्यातलं मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टवर आक्षेप घेण्यात आला आहे. छत्तीसगड भाजपाच्या सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या या तीन पोस्ट हटवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र, ही सर्व कार्यवाही तोंडीच झाल्यामुळे भाजपावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. छत्तीसगड भाजपानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी छत्तीसगड भाजपाला त्यांच्या सोशल मीडियावर असणाऱ्या तीन पोस्ट काढण्यास सांगितले. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक आयुक्त रीना कांगला यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. “भविष्यात अशा प्रकारच्या पोस्ट करून नयेत अशी सक्त ताकीद छत्तीसगड भाजपाला देण्यात आली आहे”, अशी माहितीही रीना कांगला यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?

काढण्यात आलेल्या तीन पोस्टमध्ये नेमकं काय?

या तीन पोस्टपैकी पहिली पोस्ट १५ मे रोजी अपलोड करण्यात आली होती. यातील अॅनिमेटेड व्हिडीओमध्ये मुस्लीम समुदायाची टोपी घातलेली आणि हिरव्या कपड्यांमधली एक व्यक्ती एका महिलेची संपत्ती लुटत असल्याचं दाखवण्यात आलं. ही महिला मदतीसाठी याचना करत असताना राहुल गांधींचं एक कॅरिकेचर तिथे येऊन महिलेचं पर्स हिसकावून घेत त्या लुटणाऱ्याच व्यक्तीला देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओला सुमारे अडीच हजार लाईक्स आले होते.

दुसऱ्या पोस्टमध्ये याच प्रसंगाचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात राहुल गांधींचं कॅरिकेचर सदर महिलेचं मंगळसूत्र हिसकावून घेऊन लुटणाऱ्या व्यक्तीला देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. २० मे रोजी ही पोस्ट अपलोड करण्यात आली होती.

तिसरी पोस्ट २३ मे रोजी छत्तीसगड भाजपाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली होती. त्यात कर्नाटक भाजपानं ७ मे रोजी शेअर केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये राहुल गांधी ‘मुस्लीम’ लिहिलेलं एक मोठं अंडं एका घरट्यात ठेवत असल्याचं दाखवण्यात आलं. त्यात एससी, एसटी आणि ओबीसी लिहिलेली इतरही छोटी अंडी असल्याचं त्यात दाखवलं होतं. मुस्लीम लिहिलेल्या अंड्यातून बाहेर आलेली गोष्ट हळूहळू मोठी होऊन इतर अंड्यांना घरट्याच्या बाहेर ढकलून देत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. या पोस्टला १०४० लाईक्स आले होते.

भारतीय जनता पक्षाचं म्हणणं काय?

दरम्यान, भारतीय जनता पक्षानं या पोस्ट आक्षेपार्ह असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. “आम्हाला निवडणूक आयोगाकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. पण आम्ही त्या पोस्ट काढल्या आहेत. त्या पोस्टमध्ये धार्मिक असं काहीही नव्हतं. या पोस्ट काँग्रेसकडून प्रचार करण्यात येत असलेल्या वारसा कर आणि इतरांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याच्या धोरणाशी संबंधित होत्या”, असा दावा छत्तीसगड भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे सदस्य सोमेश पांडे यांनी केला.

सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान; सहा राज्यांतील ५८ जागांचा समावेश; दिल्ली, हरियाणातील सर्व जागांवर मतदान

काँग्रेसकडून कायदेशीर कारवाईची मागणी

भाजपानं दावे फेटाळले असताना काँग्रेसनं मात्र कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. “भाजपा देशातील सौहार्दाचं वातावरण बिघडवण्याचं कारस्थान करून काँग्रेसला बदनाम करत आहे. हे फार गंभीर आहे. त्यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचा सपाटाच लावला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया हँडल्सवरून असे डझनावारी व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. हे हँडल्स बंदच करायलाल हवेत. फक्त भाजपाला इशारा देऊन उपयोग नाही. निवडणूक आयोगानं भाजपाविरोधात कायदेशीर कारवाई करायला हवी”, अशी मागणी छत्तीसगड काँग्रेसच्या कम्युनिकेशन सेलचे प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी केली आहे.

देशात सहाव्या टप्प्यासाठी मतदान

दरम्यान, देशभरातील ८ राज्यांमध्ये शनिवारी सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या टप्प्यात हरियाणा आणि दिल्लीमधील सर्व जागांसाठी मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी गेल्या वर्षभरात शेतकरी आंदोलन व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची अटक यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. त्याशिवाय या टप्प्यातील इतर मतदारसंघांपैकी ४० जागांवर गेल्या निवडणुकीत भाजपानं विजय मिळवला होता.

Story img Loader