Solapur South सोलापूर दक्षिण या ठिकाणी काँग्रेसने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडदी यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीत मीठाचा खडा ( Solapur South ) पडला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे म्हणजे भाजपाच्या बी टीम आहेत असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहेत शरद कोळींचे आरोप?

Solapur South “प्रणिती शिंदे या भाजपाच्या बी टीम आहेत. भाजपासह प्रणिती शिंदेंनी आतून हातमिळवणी केली आहे. प्रणिती शिंदे भाजपाचा प्रचार करत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं की ही त्यांच्या घरातली शेवटची खासदारकी आहे. यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही.” असं म्हणत शरद कोळी यांनी जोरदार टीका केली आहे.

हे पण वाचा- Maharashtra Elections 2024 : घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी केले एकत्रित मतदान

शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला

शरद कोळी म्हणाले, शिंदे कुटुंबाने आमचा केसाने गळा कापला. भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदेंनी अपक्ष ( Solapur South ) उमेदवाराला पाठिंबा दिला. अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील असून त्यांना निवडून आणायचं आहे. मात्र शिंदे कुटुंबाने पाठीत खंजीर खुपसला आहे. ही माणसं ( Solapur South ) धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार असं कोळी यांनी म्हटलं आहे.

प्रणिती शिंदेंचं म्हणणं काय?

“लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. लोकशाही किती टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार आहे. भाजपाला त्यांचा पराभव दिसतो आहे त्यामुळे दिग्गज नेते पैसे वाटताना पकडले गेले आहेत. महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत येईल. लोकसभेत जे घडलं तसंच या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा विजय होईल. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले आहेत. आम्ही आघाडी धर्म ( Solapur South ) पाळला. आमच्या शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं एबी फॉर्म देऊ नका आम्ही तो दिला नाही. काही कारणामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकली नाही. बहुदा काहीतरी गैरसमज झाला असावा. सोलापूर दक्षिण ( Solapur South ) चुकून गेलं असं वाटलं होतं. पण आम्ही आता काडदी यांना पाठिंबा दिला आहे. अनेक मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. आम्ही आघाडी धर्म पाळला आहे.” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur south seat news sharad koli harsh attack on praniti shinde and sushil kumar shinde scj