Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”

श्रीजया चव्हाण यांना भाजपाने तिकिट देताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sreejaya Ashok Chavan News
श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून तिकिट (फोटो-श्रीजया चव्हाण, फेसबुक पेज)

Sreejaya Chavan : विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election) भाजपाकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून १३ महिलांना भाजपाकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

श्रीजया यांना उमेदवारी मिळताच काय म्हणाले अशोक चव्हाण?

श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांना भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. लेकीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे खासदार आणि श्रीजया यांचे वडील अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, श्रीजयाची ही पहिलीच निवडणूक आहे. मला आनंद आहे की ती आतापर्यंत सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करत होती, पण आता विधानसभेच्या दृष्टीकोनातून जनमानसाची सेवा करण्याच्या उद्देशाने ती ही निवडणूक लढवेल. जनमानसाची साथही तिला या निवडणुकीसाठी मिळेल. याआधीही ती या मतदारसंघात चांगलं काम करत होती आणि आता उमेदवार या नात्याने तिला काम करायला अधिक बळ मिळेल. मला खात्री आहे, जो मतदारसंघ मी इतकी वर्ष सांभाळला आणि जोपासला तो ती नक्कीच चांगल्या पद्धतीने सांभाळेल.

The nomination drama in Nalasopara ended Sunday, with BJP announcing Rajan Naik as candidate
नालासोपारा मतदार संघ भाजपकडे, राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Maharashtra Election 2024 Top Ten Richest candidates
Maharashtra Assembly Election 2024 : कोण आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार? ‘या’ १० नेत्यांकडे आहे बक्कळ संपत्ती
mahesh Gangane, Congress, akot assembly constituency
अकोटमध्ये काँग्रेसचा गणगणे परिवारावर विश्वास, ॲड.महेश यांना दुसऱ्यांदा, तर कुटुंबात सातव्यांदा तिकीट; गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व
Happy Narak Chaturdashi 2024 Wishes in Marathi
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त WhatsApp स्टेटस, फेसबुकला शेअर करण्यासह तुमच्या प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा!

अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात गेले. भोकर मतदार संघातून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेश केला होता. भोकर अशोक चव्हाण यांचा पारंपारिक मतदार संघ आहे. आपल्या मुलीला निवडून आणणे अशोक चव्हाण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. कारण अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यानंतरही नांदेड लोकसभा भाजपला गमवावी लागली होती.

श्रीजया अशोक चव्हाण कोण आहेत?

श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. त्या पेशाने वकील आहेत. तसंच भाजपाने तिकिट देण्याआधी भाजपा युवा मोर्चाचं काम करत आहेत. भाजयुमोने विकसित महाराष्ट्रासाठी आयडिया हा कार्यक्रम त्यांनी सुरु केला आहे. मुदखेड या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकले होते. तेव्हापासूनच श्रीजया चव्हाण आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील काही महिन्यांपासून श्रीजया चव्हाण या राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसले. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असतील हे लक्षात घेवून चव्हाण यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला होता. आता त्याचा किती फायदा होते ते कळेल. दरम्यान मतदार संघात श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांचे भावी आमदार म्हणून बॅनरही झळकले होते. आता भाजपाने त्यांनी भोकरमधून संधी दिली आहे. त्या निवडून येणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sreejaya chavan gets ticket from bjp she will fight election from bhokar constituency scj

First published on: 20-10-2024 at 17:45 IST

संबंधित बातम्या