Nandgaon Assembly Election 2024 : नांदगाव नावाची महाराष्ट्रात ७२ गावं आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या मतदारसंघाचं महत्त्व वेगळं आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे ठिकाण आहे. तसंच हा मतदारसंघ आधी पंकज भुजबळांचा आणि आता सुहास कांदेंचा आहे. महाराष्ट्रात निवडणूक पार पडली आहे. मतदानाच्या दिवशी समीर भुजबळ यांना सुहास कांदेंनी धमकी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक चर्चेत राहिली.

नांदगाव हे शहर जिल्ह्याचं मुख्यालय नाशिक शहरापासून जवळपास १०० किमी अंतरावर् आहे. नांदगाव मध्य रेल्वेचं स्थानक असून मुंबई -भुसावळ मार्गावर मनमाड नंतरचं स्थानक आहे. नांदगाव मधील एकवीरादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवे कालीन असून ते ३५० वर्ष जुने आहे.सुहास कांदे ( Nanadgaon) मराठी राजकारणी आहेत. हे नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता आपला गड राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. समीर भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Chhagan Bhujbal in Yeola Constituency Assembly Election 2024
Yeola Vidhan Sabha Constituency : येवल्याचं मैदान छगन भुजबळ मारणार का? एक्झिट पोल्सचा कौल महायुतीच्या बाजूने
maharashtra vidhan sabha election 2024
‘मोदींची सभा नको रे बाप्पा!’ भाजप उमेदवारांना धडकी
Shiv Sena Shinde faction sent AB applications by helicopter to Deolali and Dindori shocking NCP
शिवसेना शिंदे गटाचा अजित पवार गटाला धक्का, हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज आणून देवळाली, दिंडोरीत बंडखोरी

२००९ आणि २०१४ ची स्थिती काय होती?

२००९ मध्ये नांदगाव (Nanadgaon ) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ आमदार झाले. तर २०१४ मध्ये त्यांनी सुहास कांदेंचा ( Suhas Kande ) १८ हजार ४३६ मतांनी पराभव केला आणि ते या मतदारसंघाचे आमदार झाले. सलग दोनवेळा आमदार होण्याचा रेकॉर्ड पंकज भुजबळ यांनी त्यांच्या नावावर नोंदवला आहे.

नांदगाव मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग

नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केला. त्यावेळी पंकज भुजबळ यांना ९६ हजार २९२ मतं मिळाली तर संजय पवार यांना ७४ हजार ९२३ मतं मिळाली होती. २०१४ मध्ये ही लढत पुन्हा एकदा पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली. सुहास कांदेंना ५० हजार ८२७ मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना ६९ हजार २६३ मतं मिळाली. सुहास कांदेंचा पराभव झाला. या पुढच्या निवडणुकीत म्हणजेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना ८५ हजार २७५ मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना ७१ हजार ३८६ मतं मिळाली.

हे पण वाचा- पक्षाच्या राजीनाम्यानंतरच समीर भुजबळ मैदानात, शिंदे गटाला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर

२०१९ ला काय घडलं?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नांदगावातून (Nanadgaon) सुहास कांदे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर २०२२ ला एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं त्या बंडात सुहास कांदेही सहभागी झाले. यामुळे घडलं असं की एकमेकांशी कट्टर वैर असलेले दोन नेते पुन्हा एकाच सरकारमध्ये आले. ते दोन नेते होते सुहास कांदे आणि दुसरे आहेत छगन भुजबळ. २०१९ च्या निवडणुकीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला. २००९ आणि २०१४ चा वचपा सुहास कांदेंनी ( Suhas Kande ) काढल्याचं या निवडणुकीत दिसून आलं.

हे पण वाचा- कारण राजकारण: कांदे-भुजबळ वादामुळे मविआला लाभ

सुहास कांदेंची राजकीय पार्श्वभूमी

या मतदारसंघातून आमदार झालेले सुहास कांदे शिवसेनेत असले तरीही ते याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. एकेकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र नंतर जेव्हा त्यांचा दबदबा वाढला तेव्हा छगन भुजबळ आणि सुहास कांदे ( Suhas Kande ) यांच्यात वैर निर्माण झालं.

छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातलं वैर लपलेलं नाही

२०२२ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केले. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नसल्याचा आरोप सुहास कांदे ( Suhas Kande ) यांनी याचिकेत केला होता त्यामुळे ते चर्चेत आले होते. तसंच छगन भुजबळांशी त्यांचं असलेलं वैर हे लपून राहिलेलं नाही.

नांदगावात सुहास कांदेंचं वर्चस्व

१० मे २०२३ ला सुहास कांदेंनी नांदगाव (Nanadgaon) बाजार समितीच्या निवडणुकीत पंधरा जागांवर विजय मिळवत बाजार समितीची सत्ताही राखली आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. नांदगाव आणि त्या मतदारसंघातलं राजकारण हे सुहास कांदे आणि पंकज भुजबळ यांच्याभोवती फिरत आलं आहे. सध्या या मतदारसंघात सुहास कांदेंचं वर्चस्व आहे यात शंका नाही. आता प्रश्न आहे तो या निवडणुकीचा येत्या निवडणुकीत ते गड राखतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.