Supriya Sule Criticizes BJP over Tutari, Pipani Symbol: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपासह सत्ताधाऱ्यांवर ते रडीचा डाव खेळत असल्याची टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हांतील गोंधळामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. लाखो मतदारांनी पिपाणीला तुतारी समजून मतदान केल्याने राष्ट्रवादीला फटका बसला होता, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. आता विधानसभा निवडणुकीतही अनेक मतदारसंघात मतदान यंत्रावर तुतारी आणि पिपाणी ही चिन्हे आल्यामुळे पुन्हा एकदा मतदरांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

तुतारी आणि पिपाणी चिन्हांच्या गोधळांवर पत्रकारांशी बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा रडीचा डाव खेळत आहे, याचे मला आश्चर्य वाटत नाही. याबद्दल अजित पवारांनी सभेत कबुली दिली आहे की, साताऱ्यात भाजपाचा विजय तुतारी आणि पिपाणीतील (ट्रम्पेट) गोंधळामुळेच झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष रडीचा डाव सारखेच खेळतो हे अजित पवारांच्या विधानातूनच समोर आले आहे.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

163 ठिकाणी अपक्षांना पिपाणी चिन्ह

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला सर्व २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. दरम्यान यावेळीही मतदान यंत्रावर १६३ ठिकाणी अपक्ष उमेदवारांना पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह देण्यात आले आहे.

हे ही पाहा: ‘इन्हे’ कोन नही जानता अमित शहा ‘हे’ आवाहन करण्यास विसरले

लोकसभेला साताऱ्यात काय घडले?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे तर भाजपाकडून उदयनराजे भोसले मैदानात होते. शशिकांत शिंदे तुतारीवर तर उदयनराजे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत होते. अशात अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना पिपाणी (ट्रम्पेट) चिन्ह मिळाले होते. पिपाणी या चिन्हावर गाडे यांना ३७ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला होता की, अनेक मतदारांनी पिपाणीला तुतारी समजून मतदान केल्याने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. नुकतेच महायुतीत असलेलेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पिपाणीमुळे साताऱ्यात महायुती जिंकली असे विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या या विधानाची राज्यभरात चर्चा झाली होती.

Story img Loader