Premium

“दमदाटी करणाऱ्यांना विनम्रपणे सांगायचंय की…”, सुप्रिया सुळेंचा टोला; अजित पवारांना प्रत्युत्तर!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यांना कशाला घाबरता? हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर डंके की चोटपर मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषणं करतो”

supriya sule ajit pawar latest news
सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

निलेश लंके यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याविरोधात जाहीर सभांमधून थेट टीका करायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने निलेश लंके यांच्या प्रचारार्थ एकीकडे महाविकास आघाडीचे नेते प्रचार करत असताना दुसरीकडे अजित पवारांनी स्वत: निलेश लंके यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. मात्र, आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांना थेट प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवारांचा निलेश लंकेंना जाहीर इशारा!

अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याविरोधात प्रचारसभा घेताना त्यांना जाहीर इशारा दिला आहे. “अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर धमक्या दिल्या, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझी अशी जिरवीन, की पुन्हा तु्ला सतत अजित पवारच डोळ्यांसमोर दिसेल. तू माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्याचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है? तू काय समजतोस स्वत:ला?” असा धमकीवजा इशाराच अजित पवारांनी दिला.

जाहीर सभांमधून अजित पवारांकडून निलेश लंकेंना अशा प्रकारे थेट इशारे दिले जात असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी निलेश लंकेंसाठी प्रचार करत असताना त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. जाहीर प्रचारसभेत सुप्रिया सुळेंनी केलेल्या या टीकेचा रोख थेट अजित पवारांच्याच दिशेनं असल्याचं बोललं जात आहे.

पक्ष ओरबाडून घेण्यात मजा नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला, ‘मलाही मंत्री’ …

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणात नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे. “ते म्हणतात मी सकाळी लवकर उठतो. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. आणि दमदाटीचं राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला. आजच्या सभेत तर कुणीतरी त्यांचं भाषण चालू असतानाच समोरून म्हणाला, ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’. दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. निलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचं आहे, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अप्रत्यक्षपणे मोदींनाही टोला?

दरम्यान, यावेळी सु्प्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. अजित पवारांच्या टीकेवर बोलताना त्या म्हणाल्या, “यांना कशाला घाबरता? हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर डंके की चोटपर मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषणं करतो”!

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule mocks ajit pawar targeting nilesh lanke loksabha election 2024 pmw

First published on: 11-05-2024 at 09:08 IST