Premium

लेकीसाठी आई प्रचारात! प्रतिभा पवार व्यासपीठावर आल्या, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

बारामतीची लढत ही प्रचंड चर्चेत आली आहे कारण हा सामना नणंद विरुद्ध भावजय असा आहे. तसंच याकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार यांची लढाई असंही पाहिलं जातं आहे.

What Supriya Sule Said?
सुप्रिया सुळे ज्या मंचावर होत्या त्याच मंचावर प्रतिभा पवार आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत जोरात आणि जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. बारामती मतदारसंघात जी लढत होते आहे ती चर्चेत आहे. कारण हा सामना रंगतो आहे तो नणंद विरुद्ध भावजय असा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंची कन्या रेवती प्रचारात उतरली होती. आता त्यांच्या आई प्रतिभा पवार या व्यासपीठावर आल्या आणि त्यांनी हात जोडले.

बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरलं पवार कुटुंब

बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यासाठी सगळं पवार कुटुंब उतरल्याचं दिसून येतं आहे. आज सुप्रिया सुळे जेव्हा व्यासपीठावर होत्या त्या व्यासपीठावर त्यांच्या मातोश्री म्हणजेच प्रतिभा पवारांची एंट्री झाली. सुप्रिया सुळेच्या प्रचारात त्यांच्या आई प्रतिभा पवार सहभागी झाल्याचं दिसून आलं. एका भाषणात अजित पवार यांनी सांगितलं होतं की प्रतिभा काकी १९९० पासून प्रचारात उतरलेल्या नाहीत. आता आज त्यांची सुप्रिया सुळेंच्या व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रतिभा पवार या प्रसंगाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर दिसल्या.

north nagpur
ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

प्रतिभा पवार मंचावर आल्यानंतर काय घडलं?

बारामतीतल्या महिला मेळाव्यासाठी प्रतिभा पवार व्यासपीठावर आल्या. त्यानंतर उपस्थित सगळ्याच महिलांनी टाळ्यांचा गजर केला. प्रचारासाठी आलेल्या प्रतिभा पवार व्यासपीठावर मागच्या रांगेत बसल्या होत्या. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या आईने महिला मेळाव्यासाठी यावं हा सुनंदा वहिनींचा आग्रह होता. त्यामुळेच आई व्यासपीठावर आली होती. माझी मुलगीही प्रचारात सहभागी होते, पॉम्प्लेट वाटते.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच प्रतिभा पवार त्यांना २०१४ मध्ये काय म्हणाल्या होत्या ते पण सांगितलं.

हे पण वाचा- प्रचार खर्चात तफावत आढळल्याने सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

२०१४ ला आई म्हणायची महागाई वाढली आहे..

“२०१४ मध्ये आम्ही जेव्हा घरी जायचो तेव्हा आई म्हणायची यावेळी तुमचं सरकार येत नाही. त्यावर मी आईला विचारत असे की तुला असं का वाटतं? तर आई म्हणायची की महागाई वाढली आहे त्यामुळे तुमचं सरकार येणार नाही. आईचं म्हणणं खरं ठरलं. आता आम्ही घरी गेलो की पुन्हा आई सांगते महागाई वाढली आहे. भाज्या महाग झाल्या, डाळी महागल्या, दुधाचे भाव सगळंच वाढलंय असं आई म्हणते. लोक महागाईने त्रस्त झाल्याचंही ती सांगते. त्यामुळे आताही हे सरकार येईल येत नाही.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

५०० च्या नोटाच गायब झाल्या

“बारामती सहकारी बँकेतल्या पाचशेच्या नोटा गायब झालेले आहेत, असं कळतंय ह्या सगळ्याची माहिती आम्ही घेत आहोत. सुनंदा वहिनी प्रचारामध्ये जे बोलल्या ते खरं होताना दिसत आहे. धनशक्तीच्या वापरावरुन पुरावा मिळाला तर आम्ही तक्रार नक्की करणार”, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule mother pratibha pawar attend women rally in baramati for supriya sule election campaign scj

First published on: 03-05-2024 at 18:26 IST

संबंधित बातम्या