राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज निवडणूक ७ मे रोजी पार पडली. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला. या दोघींचंही भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता बाजी कोण मारणार याचा फैसला ४ जून रोजी होणार आहे. अशात सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघाला कुणाची तरी दृष्ट लागली आहे असं वक्तव्य केलं आहे जे चर्चेत आलं आहे.
दत्ता भरणेंचा व्हिडीओ पाहून वाईट वाटलं
दत्ता भरणेंचा तो व्हिडीओ पाहून मला वाईट वाटलं. एका गरीब कार्यकर्त्याला ते अशा प्रकारे धमक्या देत होते शिवीगाळ करत होते. मला खूप वेदना झाल्या. कारण मी आणि दत्तामामांनी अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. आता ते अशी भाषा बोलत आहेत. मी त्या कार्यकर्त्याला आणि त्याच्या पत्नीला भेटले ते दोघंही खूप नाराज झाले होते. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामतीत पैसेवाटप, दमदाटी होणं दुर्दैवी
बारामती लोकसभा मतदार संघात पैसेवाटप झालं, धमक्या, दमदाटी करण्यात आली. हे लोकशाहीसाठी काही चांगलं चित्र नाही. जी मतदारांनी साथ दिली त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानते. आता महागाई, दुष्काळ आणि बेरोजगारी याविरोधात आम्ही लढत राहू. तसंच संपूर्ण निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगली असेल असा मला विश्वास वाटतो, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- अजित पवारांचा सवाल, “मी आईबरोबर मतदान करायला गेलो तर तुमच्या पोटात का दुखलं?”
“देशात जी परिस्थिती आणि गलिच्छ राजकारण हे महाराष्ट्रात आणि देशात सुरु आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे हे दुर्दैवी आहे. एका सशक्त लोकशाहीसाठी हे हानिकारक आहे. त्यामुळे मतदारांना हे वाटत असेल की काय चाललं आहे? त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला आहे असं मला वाटतं.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामती मतदारसंघाला दृष्ट लागली आहे असं वाटतं
“पैसे वाटप, दमदाटी, व्हिडीओ समोर येणं या सगळ्या गोष्टी घडल्या. आम्ही काही दमदाटी केली नाही, पैसे वाटले नाहीत. एका सशक्त लोकशाहीत अशा गोष्टी होणं दुर्दैवी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात स्वातंत्र्य मिळाल्यापासून असं कधीही घडलं नाही. प्रचंड आणि दुःख आणि वेदना देणारा हा प्रकार आहे. या मतदारसंघाची आन-बान आणि शान संपूर्ण देशात आहे. अशा मतदारसंघात असे प्रकार घडणं म्हणजे मतदारसंघाला कुणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा गालबोट लागलं आहे असंच वाटतं. अनेक लोकांनी मला फोन करुन आश्चर्यही व्यक्त केलं.”
त्या प्रश्नाचं उत्तर शरद पवारच देऊ शकतील
“अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे शरद पवार म्हणाले आहेत. याचं उत्तर शरद पवारच देऊ शकतील. दोन तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक लागेल. आता संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढतो आहोत. दडपशाही मोडण्यासाठी आम्ही लढतो आहोत. देशात सध्या नैतिकता राहिलेली नाही.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.