Voting Turnout In Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम आणि मतदानाच्या आकडेवारीमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाची तात्पुरती आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यातील फरकाबाबत चिंता व्यक्त केली आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी ५५ टक्के दाखविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी ही टक्केवारी ६७ टक्क्यांवर गेल्याचे दाखवण्यात आले. मतदानाची ही टक्केवारी गेल्या तीन दशकातील सर्वोच्च होती.

मतदानाची टक्केवारी नोंदवण्याची प्रक्रिया

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, एस. वाय. कुरैशी म्हणाले की, मतदारांच्या मतदानाची आकडेवारी रिअल-टाइममध्ये नोंदवली जाते आणि नंतर यामध्ये होणारी ही प्रचंड तफावत चिंताजनक आहे.

AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
One Nation One Election
One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ अहवालाच्या मसूद्यासाठी किती पैसे खर्च झाले? सरकारने सांगितलेल्या आकड्यावर विश्वास बसणार नाही
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Arvind Kejriwal On Delhi Election
Delhi Elections : दीड महिना आधीच खुलेआम पैसे वाटप सुरू; केजरीवालांचा आरोप
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?

मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी कशी नोंदवली जाते, हे सांगताना एस. वाय. कुरैशी म्हणाले, “मी जे काही पाहतोय ते नक्कीच चिंताजनक आहे. ही आकडेवारी रिअल टाइममध्ये अपडेट केली जाते. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा निवडणूक अधिकारी मतदाराची उपस्थिती नोंदवतात. मतदनाच्या दिवशी शेवटी १७ सी अर्जात दिवसभरातील मतदानाची आकडेवारी नोंदवली जाते. तसेच त्यावर निवडणूक अधिकारी उमेदवाराच्या एजंटच्या सह्या घेतात. “

“फॉर्म 17सी मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले याची नोंद केली जाते. हा रिअल-टाइम डेटा त्याच दिवशी प्रकाशित केला जातो. मग दुसऱ्या दिवशी डेटा कसा बदलू शकतो ते मला समजत नाही,” असे कुरैशी पुढे म्हणाले.

हे ही वाचा : गेल्या वेळीचे ५७ हजारांचे मताधिक्य २७ हजारांवर कसे आले? जरांगे पाटलांचे नाव घेत भुजबळांनी सांगितले कारण 

निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी पुढे म्हणाले की, “या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे आणि याबाबत योग्य स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशभरात ज्याप्रकारे शंका पसरत आहेत, जर त्या प्रत्येकाच्या डोक्यात गेल्या तर निवडणूक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहणार नाही.”

राज्यात मतदानाच्या आकडेवारीवरुन गोंधळ

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी मध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्याबाबतचे काही पुरावेही त्यांना सार्वजनिक केले आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच असल्याबद्दल शंका उपस्थित केली आहे.

Story img Loader