धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अर्जना पाटील या लोकसभेच्या मैदानात आहेत. अर्चना पाटील यांनी आज (१९ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यासमोर जाहीर नाराजी बोलून दाखवली. धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेला आहे. यासंदर्भाने बोलताना तानाजी सावंत यांनी खंत बोलून दाखवली. “शिवसेनेचा असाच एक एक मतदारसंघ जर कमी होत राहिला तर आम्ही सहन करणार नाही”, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.

तानाजी सावंत काय म्हणाले?

“आज येथे अजित पवार आहेत. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. थोडं परखड बोलतो. धाराशिवमध्ये महायुतीचा प्रचार हा जानेवारीमध्येच सुरु झाला आहे. २६ जानेवारीपासून धनंजय सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. खरे तर हा मतदार पारंपारिक पद्धतीने शिवसेनेचा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी धाराशिव मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला”, असे तानाजी सावंत म्हणाले.

Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
What CM Eknath Shinde Said About Chhatrpati Shivaji Maharaj ?
Eknath Shinde : “छत्रपती शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार, पण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चर्चेत
sambhaji brigade workers staged a strong protest in front of sculptor jaideep apte house in kalyan
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका
eknath shinde
Eknath Shinde : “राज ठाकरेंना पक्षात जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा…”; उद्धव ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi Ladki Bahini Yojana
Eknath Shinde : “…तर गाठ माझ्याशी आहे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”…

पुढे ते म्हणाले, “ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ, तेव्हा तेव्हा समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण हा नंतरचा भाग आहे. त्याआधी जर असाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हे सहन करणार नाही. हे आज या ठिकाणी सांगतो. याचे कारण हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा आहे. ८ वेळा शिवसेनेचा खासदार येथून निवडून गेला आहे. त्यामुळे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हे दु:ख विसरुन शिवसैनिकांना विनंती आहे की, अर्चना पाटील यांना आपल्याला लीड द्यायचे आहे”, असे तानाजी सावंत म्हणाले.