विद्यमान तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये ११९ जागांसाठी मतदान होणार आहे. यातील १९ जागा या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आणि १२ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ च्या शेवटी मतदान झाल्यानंतर मतमोजणी पूर्ण होऊन निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल. सध्या तेलंगणामध्ये सुमारे ३ कोटी नागरिक मतदानासाठी पात्र आहेत. २०१८ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या एकूण ११९ जागांपैकी ८८ जागांवर भारत राष्ट्र समितीने तर १९ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. याउलट सर्व मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करुनही तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा फक्त एक उमेदवार निवडून आला. कर्नाटक विजयानंतर तेलंगणावर प्रभाव पाडण्याच्या प्रयत्नामध्ये काँग्रेस आहे. तर बीआरएस सत्ता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. तर भाजपा आपला जुना पराभव विसरुन या राज्यामध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Maharashtra Assembly Constituency List 2024 – Detailed Results and Information
Explore detailed results for all 288 constituencies in Maharashtra across 36 districts and 6 regions, including the 2019 Maharashtra Election results. Discover information on the winning and runner-up candidates, their party affiliations, and other critical data. Stay updated on the Maharashtra political landscape with a comprehensive list of Maharashtra Vidhan Sabha constituencies.
This page is your go-to resource for constituency-specific election results, historical insights, and candidate details.