Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातही काँग्रेसने मुसंडी मारली असून भाजपाच्या मंत्र्यांनीही या निवडणुकीत सपाटून मार खालला आहे. काँग्रेसच्या या विजयाचं देशभर कौतुक केलं जातंय. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसची लाट सुरू झाली असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> Karnataka Election : बंगळुरूत मध्यरात्री हाय वोल्टेज ड्रामा, ‘या’ कारणामुळे काँग्रेसने जिंकलेली जागा गमावली, नेमकं काय घडलं वाचा!

“काँग्रेसची लाट सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. ११० पर्यंत जागा मिळतील असं वाटलं होतं, पण कर्नाटकच्या जनतेने मोठ्या प्रमाणात दाद दिली. आपल्या देशातील जनतेचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे. तुम्ही कितीही जात-पात-धर्म वापरा, पण आपला पिंड संपू शकणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोनवेळा जनतेने चेंज म्हणून भाजपाला निवडून आणलं होतं. पण जनतेला धर्मावरून वेगळे करू शकत नाहीत. कारण, आम्ही देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही गांधींवर विश्वास ठेवणारे आहोत”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

हेही वाचा >> Video : कर्नाटकात दोन नाही, चारजण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, रामलिंगा रेड्डींनी नावेही सांगितली; मंत्रिपदाबाबतही केला मोठा दावा

“गोरगरिबांचा आवाज काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसशिवाय तळागाळापर्यंत काम करणारा पक्ष राहिला नाहीय हे कर्नाटकातील लोकांना कळून चुकलं आहे. छत्तीसगड, राजस्थानमध्येही हेच दिसले. महागाई, बेरोजगारी हे आमचे मुद्दे होते. कारण याचा चटका तुम्हा-आम्हाला सर्वांना बसतोय. याच मुद्द्यावरून आम्ही लढलो. काँग्रेसनेल कधीच कोणतीही वैयक्तित टीका केली नाही. गोर गरिबांचा प्रश्न ऐरणीवर आणला. देशाचा पिंड सर्वधर्मसमभाव आहे तर, कर्नाटकचा पिंड काँग्रेसी आहे. म्हणून उमेदवार कोणीही असो त्यांनी ठरवलं होतं की यावेळी काँग्रेसलाच जिंकून आणायचं. लोकांना एक आशा मिळाली आहे की आपण हे करू शकतो. त्यामुळे भाजपाविरोधात मदतान होताना दिसेल. दक्षिण भारतात भाजपाचा प्रभाव राहिला नाही. ही देशासाठी अतिशय चांगली बातमी आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mass of the country is sarvadhasambhava while the mass of karnataka praniti shindes reaction after the election results said sgk