“जर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यंदा देखील उत्तर प्रदेश विधानसबभा निवडणूक जिंकले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील.” असं विधान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार पुन्हा आले तर काय होईल? असा प्रश्न अखिलेश यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, “पुन्हा एकदा जर योगींनी निवडणूक जिंकली तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील. आतापासूनच डबल इंजिनची टक्कर होते आहे, भाजपावाल्याने याचा विचार करावा.” पंचायत आजतक या कार्यक्रमात अखिलेश यादव बोलत होते.

“कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मोदी पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती होतील अन् योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील”

या वेळी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख अनुपयोगी असा केला. तसेच, म्हटले की, “पंचायत निवडणुकांच्या वेळीच जनतेने जळपास निर्णय केला होता. मात्र, सरकारी यंत्रणेमुळे बहुतांश जणांना अर्जही भरता आले नाहीत. निवडणुकी दरम्यान महिलांची साडी ओढणे, कपडे फाडणे आदी घटनांच्या छायाचित्रांमुळे महाभारताची आठवणी झाली होती. अशा घटना लोकशाहीत कधीच कोणी पाहिल्या नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत ज्या प्रकारे बेईमानी झाली त्याची शिक्षा जनता भाजपाला नक्कीच देईन. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने भाजपा सरकार पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे यंदा जनता भाजपाला राज्यातून हद्दपार करणार आहे.”

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.