आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जाते आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “भाजपा एक नंबरचा संस्कारशून्य पक्ष”; सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ विधानावरून ठाकरे गटाची टीका; म्हणाले, “मोदींसमोर…”

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज भाजपाकडूनही साताऱ्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी ३० मार्च आणि ४ एप्रिल रोजी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानुसार वर्धेतून अमर काळे
दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग बारणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third list of ncp sharad pawar group released know the names of satara and raver candidate spb
Show comments