How many cash seized by ECI: महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणूक होत असून यावेळी निवडणूक आयोगाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आयोगाच्या भरारी पथकाने दोन्ही राज्यात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. मतदारांना आमिष देण्यासाठी मद्य, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंची वाहतूक होत असताना या बाबी भरारी पथकाने जप्त केलेल्या आहेत. निवडणुकीत पैशांचा वापर करून लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम काही असामाजिक तत्व करत असतात. त्यावर चाप लावण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्याप्रमाणे आयोगाने जवळपास १००० कोटींच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाने सांगितले की, एक हजार कोटीमध्ये ८५८ कोटी रोख रकमेचा समावेश आहे. २०१९ साली जप्त केलेल्या रकमेपेक्षा यावेळी सात पट अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. २०१९ साली महाराष्ट्र विधानसभेत १०३.६१ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. तर झारखंडमध्ये १८.७६ कोटी जप्त करण्यात आले होते.

हे ही वाचा >> Live: राज ठाकरेंचा तोंडावर बोट ठेवलेला फोटो व्हायरल; मतदानावेळी कॅमेऱ्यात कैद झाले भाव!

झारखंडमध्ये २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले होते. तर महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाट टप्प्यात मतदान होत आहे. दोन्ही राज्यांचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने पुढे म्हटले की, महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात रोकड जप्त करण्यात आली आहे. २०१९ पेक्षा यावेळचे प्रमाण अधिक आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतेच ३.७० कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. तर बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे ४५०० किलोंचा गांजा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत ४.५१ कोटी असल्याचे सांगितले जाते. रायगडमध्ये ५.२० कोटी रुपयांची चांदीची बिस्किटे जप्त करण्यात आली.

निवडणुकीतील पैशाच्या शक्तीचा वापर होऊ नये, यावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले होते. ज्यामुळे यावेळी जप्तीचे प्रमाण वाढले असल्याचे निवडणूक मंडळाने सांगितले. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी सांगितले की, निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सर्व अधिकारी आणि निरीक्षकांना दोन दिवस कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मतदारांना कोणतेही प्रलोभन दिले जाऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.

हे ही वाचा >> ११ वाजेपर्यंत झारखंडमध्ये महाराष्ट्राच्या दीडपट मतदान

झारखंडमध्ये किती रोकड जप्त करण्यात आली?

महाराष्ट्रासह झारखंडमध्येही जप्तीची कारवाई करण्यात आली. एका प्रकरणात २.२६ कोटींचे खाण कामासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अनेक प्रकरणात छोटी-मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousand crore seized by election commission ahead of maharashtra jharkhand state election seven times more than 2019 kvg