लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रिल) पार पडत आहे. देशातील जवळपास १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. असे असतानाही पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी लोकांना मतदानापासून रोखल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. तर हा आरोप फेटाळत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचे भाजपाच्यावतीने सांगितले जात आहे.

Thane crime bhiwandi gangster sujit patil alias tatya arrested from igatpuri
१४ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात भिवंडीचा ‘तात्या’ अटकेत; खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला होता लोकसभेत विषय
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Northeast Delhi Assembly Election Result
दंगलग्रस्त भागातही भाजपाचा डंका; तीन जागा जिंकून आघाडी, तर ‘आप’ला एकच ठिकाणी यश
Protest in Jat Miraje against the perpetrators of abusing and murdering a girl sangli news
बालिकेवर अत्याचार करुन खून, निषेधार्थ जत, मिरजेत मोर्चा
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Vijay Ghaywat, jail, Nagpur, loksatta news,
नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : आधी मतदान मग लग्न… बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क; चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ११ वाजतापर्यंत…

दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये दिनहाटा, येथील आमचे ब्लॉक अध्यक्ष आय बी अनंत बर्मन यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ५ जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज महाराष्ट्रातील काही मतदारसंघात पार पडत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Story img Loader