Premium

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

BJP and TMC
तृणमूल काँग्रेस आणि भाजपा (फोटो-संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रिल) पार पडत आहे. देशातील जवळपास १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. असे असतानाही पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी लोकांना मतदानापासून रोखल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. तर हा आरोप फेटाळत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचे भाजपाच्यावतीने सांगितले जात आहे.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : आधी मतदान मग लग्न… बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क; चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ११ वाजतापर्यंत…

दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये दिनहाटा, येथील आमचे ब्लॉक अध्यक्ष आय बी अनंत बर्मन यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ५ जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज महाराष्ट्रातील काही मतदारसंघात पार पडत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc and bjp leaders clash between in west bengal lok sabha election 2024 voting gkt

First published on: 19-04-2024 at 13:11 IST