Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ९ कोटी मतदार ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date :

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date| Maharashtra Assembly Election 2024 Date
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ तारीख| महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ वेळापत्रक

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुतद संपणार आहे. त्याआधीच राज्यात नवं सरकार स्थापन होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. तसंच, राज्यातील मतदारांची संख्याही त्यांनी सांगितली.

राज्यात १ लाख १८६ मतदार केंद्र आहेत. या केंद्रावरून राज्यभरात मतदान पार पडेल. तर राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार असून त्यामध्ये ४ कोटी ९३ लाख पुरुष मतदार असून ४. ६० महिला मतदार आहेत. तर १.८५ कोटी तरुण मतदार असून २० लाख ९३ हजार नवमतदार आहेत. ६ लाख २ हजार दिव्यांग मतदार असून १२ लाख ५ हजार ज्येष्ठ मतदार आहेत. एकूण १ लाख १८६ मतदार केंद्र असून ५७ हजार ६०१ ग्रामीण भागात आणि ४२ हजार ५८२ शहरी भागात मतदान केंद्र आहेत.

तृतीयपंथी मतदार – ६,०३१, ८५ वर्षांवरील मतदार – १२. ४३ लाख, शंभरी ओलांडलेले मतदार – ४७,७७६, दिव्यांग मतदार – ६.३६ लाख मतदार आहेत.

हेही वाचा >> Maharashtra Vidhansabha Election : ठरलं! अखेर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ‘या’ तारखेला होणार, तर निकालाची तारीखही समोर

राजीव कुमार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election ) वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. ८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Total voters in maharashtra declare by election commission of india for vidhansabha assembly election 2024 sgk

First published on: 15-10-2024 at 15:49 IST
Show comments