Tuljapur Assembly Constituency: तुळजापूरच्या मातीत कमळ बहरणार की हात पुन्हा पकड घेणार? राणाजगजितसिंह पाटील यांच्यासमोरील आव्हाने काय?

Tuljapur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच कमळ फुलले. पण यावेळी त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे.

Tuljapur Assembly Constituency Ranajagjitsinha Patil
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा कमळ फुलणार? (Photo – Loksatta Graphics)

Tuljapur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी २०१९ साली राष्ट्रवादीकडून धाराशिव (तेव्हाचा उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र ओमराजे निंबाळकर (संयुक्त शिवसेना) यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काहीच महिन्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. तत्पूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे १९९९ पासून सलग चार वेळा निवडून आले होते. भाजपाच्या तिकीटावर राणा जगजितसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा पराभव करत पहिल्यांदाच तुळजापूरात कमळ फुलवले.

तुळजापूर विधानसभेचा इतिहास?

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध तालुका आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. ऐतिहासिक असलेल्या या मंदिराच्या भोवती महाराष्ट्राचा इतिहासही फिरतो. अशा या महत्त्वाच्या तालुक्यात महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आलटून-पालटून निवडून येत असत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्व. माणिकराव खपले हे १९७८, १९८५ आणि १९९५ साली येथून निवडून आले. तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे १९९० आणि १९९९ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. राणा राणजगजितसिंह पाटील यांच्या निमित्ताने १९८५ नंतर पहिल्यांदाच तिसरा आमदार लाभला.

Union Minister Shivraj singh Chouhan criticized Sharad Pawar for favoring playgrounds over farmers fields
“शरद पवार शेतीऐवजी मैदानावर…” शिवराजसिंह चौहान यांची टीका
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Archana Patil Chakurkar
अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट
Deepak kesarkar sawantwadi
सावंतवाडीत केसरकर यांच्या विरोधात बॅनरबाजी, ‘आता बदल हवो तर आमदार नवो!’
Cm Eknath Shinde in Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!
People unhappy with Ajit Pawar Shivsena demand to leave seat so that one MLA of Mahayuti will not reduced
अजितदादांच्या आमदाराबाबत जनतेत नाराजी, महायुतीचा एक आमदार कमी होऊ नये यासाठी जागा सोडा; शिवसेनेची मागणी
Sanjay Dina-Patil, disqualification,
संजय दीना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान, शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याने अपात्र ठरवण्याची मागणी
Girish Mahajan On Eknath Khadse
Girish Mahajan : “ते पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाही”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका

हे वाचा >> Latur City Assembly Constituency: देशमुख गढीचं यावेळीही लातूरवर वर्चस्व? महायुतीचा उमेदवार कोण?

राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी निवडणूक अवघड

२०१९ साली राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना महायुतीमधील शिवसेनेचीही साथ लाभली. धाराशिवचे खासदार आणि पाटील यांचे चुलत भाऊ ओमराजे निंबाळकर यांनीही युतीधर्म पाळला. मात्र त्यानंतर युती तुटली आणि महाविकास आघाडीने आकार घेतला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षातून धाराशिव लोकसभेसाठी निवडणुकीत उतरविले. मात्र चुलत भाऊ ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अर्चना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. राणा जगजितसिंह पाटील नेमक्या कोणत्या पक्षाचे? असा संभ्रम निर्माण करण्यात ओमराजे निंबाळकर यशस्वी ठरले होते.

राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून येथे उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीला सोडून भाजपात गेलेल्या अनेक नेत्यांनी शरद पवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवला आहे. त्यामुळे यंदा तुळजापूरची विधानभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

संभाव्य उमेदवार कोण?

राणा जगजितसिंह पाटील यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी, तुळजापूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुळजापूर शहरातील महत्त्वाची मते ते स्वतःकडे वळवू शकतात, असे सांगितले जाते. तसेच काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसकडून याठिकाणी दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा खासदार असल्यामुळे शिवसेनेकडूनही हा मतदारसंघ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व्यंकटराव गुंड यांनीही तुळजापूर विधानसभेत रस दाखविला असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपामधूनच विरोध होण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल –

१) राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (भाजपा) – ९९,०३४

२) मधुकरराव चव्हाण (काँग्रेस) – ७५,८६५

३) अशोक हरीदास जगदाळे (वंचित) – ३५,३८३

वंचित बहुजन आघाडीचे मतदान कुणाला मिळणार?

२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. काँग्रेसला मिळणारी पारंपरिक मते त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने स्वतःकडे वळविली. काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा तब्बल २३,००० मतांनी पराभव झाला होता. तर वंचितचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी ३५ हजाराहून अधिक मतदान घेतले होते. जवळपास १५ टक्के मतदान घेणाऱ्या वंचितमुळे काँग्रेसच्या मतदानात विभाजन झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीची ताकद लोकसभेला दिसलेली नाही. त्यामुळे ही मते यंदा कुणाकडे जातात? त्यावर निकाल अवलंबून असेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tuljapur assembly constituency election 2024 mla ranajagjitsinha patil result congress shiv sena ncp candidate kvg

First published on: 09-10-2024 at 12:26 IST

संबंधित बातम्या