लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर बुधवारी (दि. ८ मे) गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील दाहोड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान केल्याप्रकरणी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मतदान करताना फेसबुक लाईव्हही यावेळी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. काँग्रेसने या दोन कार्यकर्त्यांवर बोगस मतदान केल्याचा आरोप केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. या दोन कार्यकर्त्यांनी जवळपास २५ मतदान केंद्रांना भेट दिली आहे. तसेच संतरामपूर येथे विविध ठिकाणी बोगस मतदान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आरोपी विजय बाभोर (वय २८) याने मतदान करतानाचे फेसबुक लाईव्हदेखील केले होते. या व्हिडीओमध्ये आरोपी विजय प्रथमपूर येथील एका बूथमध्ये प्रवेश केल्याचे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत असल्याचे दिसत आहे. विजय भाभोर म्हणतो, “आम्हाला १० मिनिटे द्या. आम्ही इथे बसतो. सकाळपासून मतदान सुरू आहे. असे चालणार नाही. इथे फक्त भाजपाच चालणार. ईव्हीएम मशीन आमच्या बापाची आहे.”

Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
sanjay gaikwad mutton liquor
Video : “मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे; ते विकले…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडीओने खळबळ
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन

याशिवाय विजय भाभोर हा इतर मतदारांनाही कमळ चिन्हाचे बटण दाबावे, यासाठी उद्युक्त करताना दिसत आहे. तसेच ईव्हीएम यंत्रासह आरोपी नाचतानाही दिसत आहे. यावेळी तो त्याच्या सहकाऱ्याला सांगतो की, हा पूर्ण परिसर आपल्याच नियंत्रणात आहे. याठिकाणी भाजपाचे विद्यमान खासदार जसवंतसिंह भाभोर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

महिसागर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जयदीपसिंह जडेजा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, दोन्ही आरोपींना आम्ही अटक केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आम्ही विजय भाभोर आणि त्याचा सहकारी मनोज मगन (वय ३८) यांना बोगस मतदान केल्याप्रकरणी अटक केली आहे. दोघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. तर आरोपी विजय भाभोरचे वडील रमेश भाभोर हे संतरामपूर तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष होते”, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

काँग्रेसने या घटनेवरून निवडणूक आयोग आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजपावर मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोषी म्हणाले की, गुजरातमध्ये मतदारांना धमकविण्याचे आणि त्यांना मतदानापासून परावृत्त करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. दाहोदमध्ये घडलेला प्रकार तर सर्वात धक्कादायक होता. भाजपा नेत्याचा मुलगा बोगस मतदान करताना आढळून आला आहे. तसेच फेसबुक लाईव्हरच हा आरोपी प्रशासन माझ्या नियंत्रणात आहे, असे सांगतो.

Story img Loader