भाजपासह युती तोडून उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासघात केला. असं वक्तव्य भाजपाच्या बड्या नेत्याने केलं आहे. एवढंच नाही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या सगळ्या सिद्धातांना तिलांजली दिली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आता ते बिनबुडाचे विषय घेऊन ते शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात गेले, मोदी, फडणवीसांचा विश्वासघात केला. पियूष गोयल यांनी ही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांना माझा सवाल आहे..

मला जे आऊटसाइडर म्हणतात त्या संजय राऊत यांना विचारायचं आहे की वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली मग ते आऊटसाईडर नाहीत का? तसंच मला त्यांनी सांगावं की राहुल गांधी आणि वायनाडचा काय संबंध आहे? तिथे राहुल गांधी आऊटसाईडर नाहीत का? या दोन प्रश्नांची उत्तरं संजय राऊत यांनी द्यावीत असं पियूष गोयल म्हणाले आहेत. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली.

हे पण वाचा Sanjay Raut on PM Modi: “तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात”, संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका!

उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला

“उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसहही विश्वासघातच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विश्वासघात केला. बाळासाहेब ठाकरेच म्हणाले होते की काँग्रेससह जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेन. पण उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी अभद्र आघाडी केली. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरे मंचावर असताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कितीतरी वेळा सांगितलं की पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांची महत्वकांक्षा किंवा वचन हे काहीही बोलून दाखवलं नाही. मोदींच्या नावाने मतं मागितली होती. आता बिनबुडाचे मुद्दे उद्धव ठाकरे बाहेर काढत आहेत. त्यांचा पक्ष फुटला त्याचं कारण तेच आहेत.” असं पियूष गोयल म्हणाले.

उद्धव ठाकरे चुकीचं वागल्यानेच शिवसेनेत बंड

लोकांना आणि शिवसेनेतल्या लोकांना कळलं की उद्धव ठाकरे काय करत आहेत तेव्हा त्यांनी बंड पुकारलं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंसह मोजके लोकच राहिले. अजित पवार आमच्याबरोबर आले तेव्हा तर हे समजलं आहेच की २०१७ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये राष्ट्रवादीला आमच्यासह यायचं होतं. अजित पवार सरकारमध्ये येणार हे शरद पवारांना माहीत होतं. मात्र शरद पवारांनी अजित पवारांचा विश्वासघात केला असंही पियूष गोयल म्हणाले. मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात पियूष गोयल यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray betrayal of trust to narendra modi and devendra fadnavis said piyush goyal scj
Show comments