लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा जागांवर मतदान पार पडत आहेत. त्यासाठी मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तर काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं आहे.

मुंबईत संथगतीने मतदान सुरु असल्याच्या तक्रारींनंतर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी बोलताना निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच मुंबईतील ज्या मतदान केंद्रावर शिवसेनेची मतं आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संथगतीने मतदान सुरु असेही ते म्हणाले.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”

हेही वाचा – “तोंडावर कधीच आपटलेत, आता त्यांची तोंड फुटतील”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आज महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. त्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. यावेळी मतदारांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांची खूप गर्दी आहे. मात्र, ज्या मतदान केंद्रावर शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पराभवाच्या भीतीने जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून ते केवळ भाजपाच्या इशाऱ्यावर काम करते आहे”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

“पराभवाच्या भितीपोटी हा प्रकार सुरू”

पुढे बोलताना, “निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात असून त्याचा त्रास मतदारांना त्रास होतो आहे. काही मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नाही. तरीही मतदार रांगा लाऊन उभे आहे. मात्र, जाणीवपूर्वक संथगतीने मतदान सुरू आहे. केवळ पराभवाच्या भितीपोटी हा प्रकार सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

“…तर ते खपवून घेतलं जाणार नाही”

“ज्या मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान सुरू आहे. त्याठिकाणी नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे नाव विचारावे. त्याची माहिती शिवसेनेच्या शाखेत द्यावी, उद्या न्यायालयात दाद मागताना ही माहिती कामी येईल. तसेच मी पत्रकारपरिषदेत याची माहिती देईल. कारण नसताना अधिकारी छळ करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “…तर निवृत्ती घेतली असती”; फडणवीसांचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, “जर वेळ आली”

“मतदान केल्याशिवाय नागरिकांनी जाऊ नये”

पुढे बोलताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थिती मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. “मतदान करणे हा आपला हक्क आहे. हा हक्क आपण बजावायलाच हवा. कितीही उशीर झाला, तरी मतदान केल्याशिवाय नागरिकांनी मतदान केंद्रातून बाहेर पडू नये”, असे ते म्हणाले. तसेच “मोदी सरकार पराभवाच्या भीती घाबरले असून निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.