Premium

उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलं, “बाळासाहेबांच्या आत्म्याची चिंता तुम्ही करु नका, २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली तेव्हा..”

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा आत्मा सैतानाला विकला आहे का? असाही सवाल केला.

Uddhav Thackeray Criticized Narendra Modi
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावले खडे बोल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर छत्रपती संभाजी नगरच्या भाषणात जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी भाषा वापरत आहेत ती त्यांना शोभत नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी त्यांचा आत्मा सैतानाला विकला आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच बाळासाहेबांच्या आत्म्याची चिंता तुम्ही करु नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार तुम्ही केला का?

“आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक, खासगी जीवनाबाबत बोललो नव्हतो, तसं बोलण्याची इच्छाही नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान होण्यासाठी माझी सही घेतली होती. गुरुवारी तुम्ही जे बोललात त्यासाठी तुम्हाला क्षमा करु शकत नाही. माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणालात. मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला आहे का? जसं अदाणीला सगळं विकलं तसं तुम्ही आत्माही सैतानाला विकला का? बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा खरंच विचार तुम्ही करा. २०१४ मध्ये माझ्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही पंतप्रधानपदासाठी घेतला होता. मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी मुंबईत परतलो तेव्हाच मला एकनाथ खडसेंकडून का कळवलंत की आपली युती तुटली? तेव्हा मी युती तोडली नव्हती. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली तेव्हा काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला हा विचार तुम्ही केला नाहीत का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

हे पण वाचा- “पंतप्रधान मोदी भानावर नाहीत, त्यांची भाषणंही…” एनडीएत येण्याच्या प्रस्तावावरून संजय राऊतांची खोचक टीका!

बाळासाहेबांच्या आत्म्याची चिंता तुम्ही करु नका

“२०१९ मध्ये बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह यांनी मला वचन दिलं होतं की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटायचं. मग ते वचन तुमच्याकडून मोडलं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटलं होतं? परवा माझ्याबद्दल म्हणालात की ऑपरेशनचा सल्ला तुम्हीच मला दिला. हे सगळं झूठच आहे. पण रोज चौकशी करत होतात हेदेखील मोदींनी सांगितलं. मग तेव्हा माझ्या हातापायांची हालचाल होत नव्हती, आता मी तुमच्यासमोर उभा आहे ते लोकांच्या प्रेमामुळे उभा आहे. मी हालचाल करु शकत नव्हतो त्याचवेळी माझ्या पक्षात तुम्ही तुमच्या आत्ताच्या पाव उपमुख्यमंत्र्यांकडून गद्दारीची बीजं पेरलीत. चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलंत तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटलं असेल? त्यामुळे तुम्ही त्यांच्या आत्म्याची चिंता करु नका. मुंबईत रोड शो करणार आहेत, आले ना रस्त्यावर?” असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव; उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले…

४०० पार जाणार आहात तर मग डोळे का मारता?

“पंतप्रधान मोदी जी भाषा वापरत आहेत ती त्यांना शोभा देत नाही. माझ्या हिंदुस्थानात, माझ्या महाराष्ट्रात अशी भाषा खपवूनच घेतली जात नाही. पंढरपूरच्या वारीतही फुगड्या वगैरे खेळून नंतर एकमेकांच्या पायाला हात लावून माऊली म्हणायची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेमकं काय करायचं आहे त्यांनी ठरवावं. आजपर्यंत त्यांनी सगळं फोडलं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. तरीही कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार असं चाललं. एके ठिकाणी सांगायचं नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी. नंतर हे असे डोळे मारायचे, म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा.” अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray criticized pm narendra modi said you do not worry about balasaheb soul scj

First published on: 11-05-2024 at 08:53 IST