Premium

उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “मोदी सरकार नव्हे तर गजनी…”

महाविकास आघाडीच्यावतीने आज इचलकरंजी येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली.

Uddhav Thackeray
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फोटो-उद्धव ठाकरे फेसबुक)

महाविकास आघाडीच्यावतीने आज इचलकरंजी येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राबाबतचा आकस हा महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांना मारण्याचा आदेश दिला होता. आताही सुरतेचे ते दोनजण महाराष्ट्र लुटत आहेत. मात्र, त्यांचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“सर्वोच्च न्यायालयाने अद्याप शिवसेनेबाबत कोणताही निर्णय दिला नाही. फक्त जे घडले ते कसे चुकीचे आहे, हे सांगितले. आता पंतप्रधान पदावर बसलेले व्यक्ती माझ्या पक्षाला नकली शिवसेना म्हणतात. याचा अर्थ हे न्यायालयावर दबाव आणत आहेत. पण यांना वेळीच आवर घातला पाहिजे. हे दबाव आणण्याचे राजकारण करत आहेत. बाकी कोणी विकले गेलेले असतील, पण सर्वोच्च न्यायालय विकले गेलेले नाही. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागला आहात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

हेही वाचा : “मतं दिली नाहीत तर…”, काँग्रेस नेत्याची भर सभेतून मतदारांना धमकी

“आज १ मे आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत होते. आज मुंबईचे महत्व दोन धोकेबाज कमी करायला निघाले आहेत. महाराष्ट्रामध्ये येणारे सर्व उद्योग गुजरातमध्ये घेऊन जात आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाईस पार्क, टाटा-एयरबस प्रोजेक्ट असे सर्वच गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत. आता टेस्लाचा आणखी एक उद्योग आपल्याकडे येत आहे. मात्र, एलॉन मस्क यांनी दौरा रद्द केला. अन्यथा त्यांनाही गुजरातला घेऊन गेले असते. कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले. मुंबईमध्ये होणारे वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेले. एलॉन मस्क हुशार आहेत. त्यांना गुजरातला जायचं नाही. कारण त्यांनाही कळले असेल की, देशातील सरकार बदलत आहे. या दळभद्र्यांचं सरकार महाराष्ट्रातच नाही तर देशात पुन्हा येणार नाही. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.

“मोदीजी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर बास आता. खरे तर हे मोदी सरकार नाही, तर हे गजनी सरकार आहे. कारण त्यांना काल काय बोलले ते आठवत नाही. २०१४ साली काय बोलले ते २०१९ ला आठवत नाही. २०१९ ला काय बोलले हे २०२४ ला आठवत नाही. आता यांना उद्या लोक विसरणार आहेत. नरेंद्र मोदी हे राजकारणात वाईड बॉल टाकतात, नो बॉल टाकतात”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. “आता मोदींनी काय काढलं, भटकती आत्मा. अजून कोण मास खातं, कोण मटण खातं. नरेंद्र मोदी गाईवर बोलतात. गाईवर बोलतात तसे जरा महागाईवरही बोला. चाय पे चर्चा केली तशी मुद्यांवर चर्चा करा”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray criticized to pm narendra modi in ichalkaranji mahavikas aghadi sabha gkt

First published on: 01-05-2024 at 21:23 IST

संबंधित बातम्या