सांगली : भाजपमधून उमेदवारीच्या शब्दावर काँग्रेसमध्ये प्रवेश करूनही उमेदवारी न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या प्रा. मोहन वनखंडे यांची मिरज मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ वापरण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय रविवारी संध्याकाळी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिरज मतदारसंघात पालकमंत्री सुरेश खाडे यांना सलग चौथ्यांदा भाजपने उमेदवारी दिली असून, त्यांनी अखेरच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनाही त्यांनी सोबत घेतले. तत्पूर्वी कदम यांच्या घरी जाऊन भेट घेऊन गैरसमज दूर करत एकोपा साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी हेही उपस्थित होते.

हेही वाचा – Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”

मंत्री खाडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले प्रा. वनखंडे हे भाजपचे प्रचार प्रमुख आणि अनूसुचित जाती सेलचे प्रदेश सरचिटणीस होते. भाजपच्या उमेदवारीसाठी गेल्या वर्षापासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात मंत्री खाडे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित होताच, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्ह्याचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील यांनी उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसचा उमेदवारीवरील हक्क संपला. यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.

मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या खा. पाटील यांना भाजपपेक्षा २५ हजार मते अधिक आहेत. या ताकदीवर काँग्रेसचा या जागेवर नैसर्गिक दावा असताना जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली. यामुळे आघाडीच्या तडजोडीमध्ये प्रा. वनखंडे यांचा राजकीय बळी गेला असल्याचे मानले जात आहे. यामुळे त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा – Manoj Jarange Patil: “मनोज जरांगेंच्या रुपात आधुनिक गांधी, आंबेडकर व मौलाना आझाद मिळतील”, मुस्लीम धर्मगुरुंची स्तुतीसुमने

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर वनखंडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असून यापुढे कोणती भूमिका घ्यायची, निवडणूक लढवायची तर काँग्रेसची ताकद कशी मिळेल, काँग्रेसचे स्थानिक नेते लोकसभेप्रमाणे मदतीला येणार का, यावर विचारमंथन सुरू असून, रविवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे वनखंडे यांनी गुरुवारी सांगितले.