देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यासाठी १० राज्यांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांनंतर अवघ्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीही हळूहळू आघाड्यांच्या पातळीवर रणनीती ठरू लागली आहे. मग ती जागावाटपाबाबत असो किंवा मग आघाड्यांच्या बाबतीतील असो. त्यातच आता विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यासंदर्भात सध्या बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. महायुतीकडून यंदाच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलं आहे. मात्र, असं असलं तरी महायुतीला बहुमत मिळाल्यास एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील, असं स्पष्ट विधान मात्र महायुतीकडून केलं जात नाही. त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरून अंदाज बांधले जात आहेत.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

खासदार संजय राऊतांनी ‘सामना’साठी उद्धव ठाकरेंची दोन भागांमध्ये मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग सोमवारी प्रदर्शित झाला. या भागात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील इतर नेते यांच्यावर टीका केली. तसेच, गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेल्या पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

“मी महाराष्ट्राच्या अभिमानाचं वेगळं मंदिर बांधतोय. त्यामुळे मला अशा फटींची, खिडक्यांची गरज नाही. ही लढाई जनतेची आहे. नाहीतर हे महाराष्ट्राला खतम करतील”, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपाकडून ऑफर झाली तरी आता भाजपासोबत जाणार नसल्याची ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी आता जाहीर केली आहे.

“…हे सगळं करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली”

दरम्यान, भारतीय जनता पक्षानं शिवसेना फोडल्याचा आरोप पुन्हा एकदा करतानाच उद्धव ठाकरेंनी मुंबईतील विकासकामांचा उल्लेख केला. “कोस्टल रोडचं स्वप्न मी दाखवलं, मुंबई महापालिकेनं ते पूर्ण केलं, त्याचं श्रेयही तु्म्ही घेत आहात. कंत्राटदारांसाठी जवळपास एक लाख कोटींच्या कामांना त्यांनी मान्यता दिली आहे. ९० हजार कोटी जाऊन पुन्हा त्यावर १० हजार कोटी चढले. मग मुंबईच्या सफाई कामगारांना तुम्ही पगार कुठून देणार? हे सगळं करण्यासाठीच त्यांनी शिवसेना फोडली”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“…तेव्हा मोरारजी देसाई म्हणाले होते, तुम्हाला गोळ्या..”, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ता आल्यावर आपण पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्राचं गेलेलं वैभव मिळवून देऊ, अशा आशयाचं विधान केल्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. “लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार. आधी केंद्रात आणि मग राज्यात येणार. मी महाराष्ट्र आणि मुंबईचं लुटलेलं वैभव परत आणेन. आर्थिक केंद्रही मी नव्याने उभारून दाखवेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, “भाजपाच्या मशीनला ज्या शिवसेनेनं करंट दिला, तो करंटच काढला तर वॉशिंग मशीन काय चालणार?” असा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader