Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना राहिलेला असताना ही बातमी समोर आली आहे. याबाबत काँग्रेसने काय म्हटलं आहे?

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? काय म्हणाले विजय वडेट्टीवार? (सर्व फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meet ? : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राकडे एक महिनाही उरलेला नाही. अशातच सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी समोर आली जी काँग्रेसकडूनच आल्याचं सांगण्यात आलं. ही बातमी अशी होती की उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे तसंच संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला, काँग्रेस हायकमांडशी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी ही चर्चा केली अशी माहिती समोर आली. एवढंच नाही तर वाऱ्यासारखी व्हायरलही झाली. महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल पासून उद्धव ठाकरे महायुतीत येणार का? इथपर्यंतच्या चर्चा झाल्या.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबत इतकी चर्चा का?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बातमी आल्यानंतर प्रचंड चर्चा झाली कारण २०१९ मध्ये जी युती मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यामुळे तुटली त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारणच बदललं. अजूनही महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोडं गंगेन न्हालेलं नाही. काँग्रेस नेत्यांकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना हव्या त्या जागा मिळत नाहीत अशी चर्चा आहे. तसंच जागावाटपावरुन नाना पटोलेंची भूमिकाही अनेकांना मान्य नाही. त्यामुळे शिवसेना ( उद्धव ठाकरे) ( Uddhav Thackeray ) आणि काँग्रेस यांच्यातून विस्तव जात नाही अशा चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची आणि संजय राऊतांनी अमित शाह यांना फोन केल्याची चर्चा रंगली. विशेष बाब म्हणजे ही बातमी काँग्रेसच्या सूत्रांनी दिल्याचंही समोर आलं होतं. एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं होतं. त्यानंतर ही बातमी व्हायरल झाली अखेर विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिलं आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि अमित शाह यांच्यात कुठलीही भेट झालेली नाही. आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपाकडून होतो आहे. कारण राज्यात भाजपा हा घाबरलेला पक्ष आहे. संजय राऊतांना तुरुंगात कुणी धाडलं? त्यामुळे अशी कुठलीही चर्चा झालेली नाही हे लक्षात ठेवा. शिवसेना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे महाविकास आघाडीबरोबर आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. जागावाटपाचा सगळा प्रश्न मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. आमची हायकमांडशी चर्चा आहे ती जागावाटपाचा पेच कसा सोडवायचा त्याबद्दल होती. आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात एक टक्काही तथ्य नाही. ही बातमी पेरली गेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यात वाद निर्माण व्हावा असं काही लोकांचा उद्देश आहे.”

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “संजय राऊत अमित शाह यांना भेटले यावर आमची चर्चा हायकमांडशी झालेली नाही. जागावाटपाचा पेच जवळपास संपत आली आहे. सात-आठ जागांवर जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेत आहोत. मंगळवारपर्यंत तो पेचही सुटेल. महाविकास आघाडी म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड है.” असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचा दावा काय?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी २५ जुलै रोजी दिल्लीतील 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. यावेळी ते एकटेच होते, ते स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या सिद्धार्थ मोकळे यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray meets devendra fadnavis sanjay raut phone call to amit shah what vijay waddetiwar said scj

First published on: 21-10-2024 at 14:50 IST
Show comments