Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी नातं जपलं नाही आणि मराठी माणासाशीही नातं जपलं नाही असं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.

What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते किरण पावसकर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले? (फोटो-लोकसत्ता)

Shivsena Vs MNS : विधानसभा निवडणूक अवघ्या २६ दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीने २७० जागांवर आमचं सगळं ठरलं आहे असं म्हणत ८५-८५-८५ चा फॉर्म्युला जाहीर केला. तर मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यातली सर्वात मोठी बाब होती ती म्हणजे अमित ठाकरेंची उमेदवारी. त्यामुळे माहीमची लढत ही आता ठाकरे विरुद्ध ठाकरे (Shivsena Vs MNS) अशी मानली जाते आहे.

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना उमेदवारी

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्यावेळी म्हणजे २०१९ मध्ये जेव्हा आदित्य ठाकरेंना उमेदवार दिली होती तेव्हा मनसेने त्यांचा उमेदवार दिला नव्हता. आता मात्र संदीप देशपांडेंना वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपलं नाही. राज ठाकरेंनी जसा मनाचा मोठेपणा दाखवला होता त्याची परतफेड करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती मात्र त्यांनी ती परतफेड केली नाही अशी टीका किरण पावसकर यांनी केली आहे. तर अमित ठाकरेंचं त्यांनी अभिनंदन केलं आहे.

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : “डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
sambhajiraje chhatrapati on kolhapur mp seat
“लोकसभेला कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देण्याचा शब्द काँग्रेसने दिला होता, पण…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Ram Raje, Ranjitsingh Naik Nimbalkar,
सत्तेत राहण्यासाठी रामराजे नेहमी पक्ष बदलतात : रणजितसिंह नाईक निंबाळकर
Dipesh Mhatre, Shinde supporter, Dombivli,
डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
Congress Leader Statement on Veer Savarkar
Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद
Chhagan Bhujbal Said This Thing About Mahatma Phule
Chhagan Bhujbal : “महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते, त्यांनी…” छगन भुजबळ यांचं महत्त्वाचं वक्तव्य

महेश सावंत यांना माहीममधून उमेदवारी

Shivsena Vs MNS उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ६५ जणांची जी यादी जाहीर करण्यात आली आहे त्यात माहीममधून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना ठाकरेंचा उमेदवार असल्याने ठाकरे विरुद्ध ठाकरे ( Shivsena Vs MNS ) अशीच अप्रत्यक्ष लढत होत आहे. त्यामुळे, या दोन्ही लढतीवरुन आता टीका टिपण्णी व राजकीय भाष्य केलं जात आहे. कारण, गत २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळी मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता.

हे पण वाचा- अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमदेवारी; माहीममध्ये होणार तिरंगी लढतं!

काय म्हणाले किरण पावसकर?

लोकशाहीच्या उत्सवात अमित ठाकरे यांना आणलं, राज ठाकरेंनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं हे खूप चांगलं झालं. मी त्यांचं अभिनंदन करेन. आमचे उमेदवार सदा सरवणकर आहेत. लोक त्यांना मतदान करतील. तिथल्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे म्हणून उमेदवारी दिली आहे. राज ठाकरेंनीही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोक काय ठरवतील ते होईल.

उद्धव ठाकरेंना भावाला जपलं नाही आणि मराठी माणसालाही जपलं नाही

मागच्या वेळी वरळीत आदित्य ठाकरे उभे राहिले हे समजल्यावर मागच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांचा उमेदवार मागे घेतला होता. आता उद्दव ठाकरेंनी माहीममध्ये उमेदवार न देता परतफेड करायला हवी होती. मात्र त्यांनी केली नाही. उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही. राज ठाकरेंनी नातं जपलं होतं. उद्धव ठाकरे फक्त खुर्ची खुर्ची Shivsena Vs MNS करत आहेत. त्यांनी मराठी माणूस आणि त्यांच्या भावालाही जपलं नाही अशी टीका किरण पावसकर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray not preserve his relationship with raj thackeray shivsena eknath shinde mla kiran pavskar criticized him scj

First published on: 23-10-2024 at 20:27 IST

संबंधित बातम्या