Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result : मुंबईतील सहा मतदारसंघात ठाकरे गटाचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. ठाकरे गटाच्या चार जागा जिंकून आल्या असून शिंदे गटाने केवळ एका गटावर मजल मारली आहे. तर, एक जागा भाजपाला मिळवण्यात यश आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मुंबईतील सहाही मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

मुंबईत दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांचा विजय घोषित करण्यात आला आहे. अनिल देसाई यांनी विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे. तर संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांना धूळ चारली आहे.

AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Torres
Maharashtra News Updates: टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, बँक खाती गोठवली
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : “अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे पक्ष प्रवेशाची मोठी यादी”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
Delhi Poll
Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत रंगणार आप विरुद्ध भाजपा सामना, ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

तर, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. या मतदारसंघात सकाळपासून भाजपाचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम आघाडीवर होते. परंतु शेवटच्या सत्रात वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. अखेर त्यांनाच विजयी घोषित करण्यात आले.

तसंच, अटीतटीच्या ठरलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंगात शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केलंय. ही जागा प्रचंड वादग्रस्त ठरली. सुरुवातीला या जागेवरून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आलं. परंतु, रवींद्र वायकरांनी यावर आक्षेप घेत पोस्टल मतदानाची फेरमोजणी करण्याची विनंती केली. त्यानुसार, फेरतपासणीनंतर अमोल किर्तीकर अवघ्या ४८ मतांच्या फरकांनी हरले आहेत.

दरम्यान, मुंबईमधून उत्तर मतदासंघातून भाजपाचे पीयूष गोयल आणि दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय घोषित करण्यात आला आहे.

मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा

शिवसेना (ठाकरे गट)शिवसेना (शिंदे गट)काँग्रेसभाजपा

मुंबई महाविकास आघाडी वि. महायुती, कोण ठरलं अव्वल?

महाविकास आघाडीमहायुती
मतदारसंघविजयी उमेदवारएकूण मते
मुंबई दक्षिण मध्यअनिल देसाई३९५१३८
मुंबई दक्षिणअरविंद सावंत३९५६५५ 
मुंबई उत्तर पश्चिमरवींद्र वायकर४५२६४४ 
मुंबई उत्तर पीयूष गोयल६८०१४६ 
मुंबई उत्तर मध्यवर्षा गायकवाड४४५५४५
मुंबई उत्तर पश्चिमसंजय दिना पाटील४५०९३७

ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये काय स्थिती?

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांचा विजय झाला आहे. त्यांना ७३ हजार ४२३१ मते मिळाली आहेत. राजन विचारेंविरोधात त्यांनी २१७०११ मतांनी विजय मिळवला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हॅट्ट्रीक मारली आहे. श्रीकांत शिंदे यांना ५८९६३६ मते मिळाली असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना ३८०४९२ मते मिळाली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांचा विजय झाला आहे. तर पालघरमध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सावरा यांचा विजय झाला आहे.

Story img Loader