Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result : मुंबईतील सहा मतदारसंघात ठाकरे गटाचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. ठाकरे गटाच्या चार जागा जिंकून आल्या असून शिंदे गटाने केवळ एका गटावर मजल मारली आहे. तर, एक जागा भाजपाला मिळवण्यात यश आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मुंबईतील सहाही मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईत दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांचा विजय घोषित करण्यात आला आहे. अनिल देसाई यांनी विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे. तर संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांना धूळ चारली आहे.
तर, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. या मतदारसंघात सकाळपासून भाजपाचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम आघाडीवर होते. परंतु शेवटच्या सत्रात वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. अखेर त्यांनाच विजयी घोषित करण्यात आले.
तसंच, अटीतटीच्या ठरलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंगात शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केलंय. ही जागा प्रचंड वादग्रस्त ठरली. सुरुवातीला या जागेवरून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आलं. परंतु, रवींद्र वायकरांनी यावर आक्षेप घेत पोस्टल मतदानाची फेरमोजणी करण्याची विनंती केली. त्यानुसार, फेरतपासणीनंतर अमोल किर्तीकर अवघ्या ४८ मतांच्या फरकांनी हरले आहेत.
दरम्यान, मुंबईमधून उत्तर मतदासंघातून भाजपाचे पीयूष गोयल आणि दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय घोषित करण्यात आला आहे.
मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा
शिवसेना (ठाकरे गट) | शिवसेना (शिंदे गट) | काँग्रेस | भाजपा |
३ | १ | १ | १ |
मुंबई महाविकास आघाडी वि. महायुती, कोण ठरलं अव्वल?
महाविकास आघाडी | महायुती |
४ | २ |
मतदारसंघ | विजयी उमेदवार | एकूण मते |
मुंबई दक्षिण मध्य | अनिल देसाई | ३९५१३८ |
मुंबई दक्षिण | अरविंद सावंत | ३९५६५५ |
मुंबई उत्तर पश्चिम | रवींद्र वायकर | ४५२६४४ |
मुंबई उत्तर | पीयूष गोयल | ६८०१४६ |
मुंबई उत्तर मध्य | वर्षा गायकवाड | ४४५५४५ |
मुंबई उत्तर पश्चिम | संजय दिना पाटील | ४५०९३७ |
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये काय स्थिती?
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांचा विजय झाला आहे. त्यांना ७३ हजार ४२३१ मते मिळाली आहेत. राजन विचारेंविरोधात त्यांनी २१७०११ मतांनी विजय मिळवला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हॅट्ट्रीक मारली आहे. श्रीकांत शिंदे यांना ५८९६३६ मते मिळाली असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना ३८०४९२ मते मिळाली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांचा विजय झाला आहे. तर पालघरमध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सावरा यांचा विजय झाला आहे.